Eknath Shinde, Devendra Phadnis, Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde return from Nagpur: धुसफूस कायम..; असं काय झालं की एकनाथ शिंदे रात्रीत तडकाफडकी नागपूरहून मुंबईत आले...?

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde return from Nagpur: महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही मोठ्या घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेतही (Shivsena) वेगाने घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी काल सायंकाळी त्या नागपूरात दाखल झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वागतासाठी नागपूरला रवाना झाले. मात्र एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून (Nagpur News) मुंबईला (Mumbai News) परतले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोलीच्या (Gadchiroli) गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री मात्र रात्रीच घाईघाईनं मुंबईला परतल्याने आता त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू मंगळवारी (४ जुलै) 7 वाजता नागपूरात (Nagpur News) आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रपतींना नागपूरच्या राजभवनात सोडल्यानंतर एकनाथ शिंदे हेदेखील तिथेच थांबणार होते. पण राष्ट्रपतींना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे.

एकनाथ शिंदे यांचे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपने अजित पवारांना सत्तेत सामील करुन घेण शिंदे गटातील बऱ्याच आमदारांना मान्य नसल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांमुळे जुने वाद पुन्हा निर्माण होऊ शकतात. अशी शिंदेंचे आमदारांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या शपथविधीनेही शिंदे गटात मोठी नाराजी असल्याच्या चर्चा आहे.

येत्या काही दिवसात मुख्यमंत्री शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांकडून केले जात आहेत.या सर्व घडामोड आणि शिंदेंचं तडकाफडकी मुंबईला, राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर असूनही दौरा रद्द करणं, यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT