Nagpur District BJP President News : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. निवडणूक प्रभारीही नेमून झाले आहेत. जिल्हाध्यक्ष बनण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असल्याने शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांना कायम ठेवण्यात येईल. पण जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती आहे. (There is information that the district president will change)
भाजपने राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यातील आपला दौरा एक दिवस पुढे ढकलून मुंबईत रवाना झाले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचे नवे अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गजभिये आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष टप्प्याटप्याने कार्यकारिणी बदलत आहेत. अलीकडेच दटके यांना नागपूर लोकसभा तर अरविंद गजभिये यांना रामटेक लोकसभा निवडणुकीचे प्रभारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती आहे.
अरविंद गजभिये यांच्या साथीला भाजपने आधी माजी आमदार सुधाकर कोहळे यांना नागपूर ग्रामीणचे प्रभारी केले आहे. त्यांनाच आता पूर्णवेळ अध्यक्ष केले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी कोहळे हे शहराचे अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले होते.
दक्षिण नागपूरचे आमदार असताना भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून ते नाराज होते. मध्यंतरी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा वावड्याही उठल्या होत्या. भाजपने ग्रामीणमध्ये पाठवून त्यांना पुन्हा सक्रिय केले आहे. थोड्याफार फरकाने पराभव होत असल्याने सावनेर आणि काटोल विधानसभा मतदारसंघात त्यांना विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली असल्याचे कळते.
शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांचाही कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना मध्य नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघात जास्त स्वारस्य आहे. त्यामुळे त्यांना येथे लक्ष घालण्यासाठी मोकळे केले जाणार असल्याचे समजते. असे असले तरी त्यांना बदलण्यात येईल, असे भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांना अजिबात वाटत नाही.
महापालिका (Municipal Corporation) निवडणुका तोंडावर असल्याचा दाखला यासाठी दिला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि युवा कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगले ट्युनिंग आहे. त्यामुळे दटके शहराध्यक्षपदावर कायम असतील, असं दिसतंय.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.