Ajit Pawar Meet Sharad Pawar : Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवारांच्या गटातील कोणते नेते पोहचले? पाहा यादी..

Ajit Pawar Meet With Sharad Pawar : घड्याळीच्या टिकटिकीने राज्यात एकच चर्चा...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. सेंटर येथे पोहचले आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्व मंत्र्यांसह ही पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे सर्व मंत्री व नते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उधाण आले आहे. (Latest Marathi News)

स्वत: अजित पवार (AjitPawar) आणि त्यांच्या गटाचे नेते आदिती तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. सेंटरवर दाखल झाले आहेत. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ हे ही पवारांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही वाय.बी. सेंटरला पोहचले आहेत. "मला सुप्रिया ताईंचा फोन आला की ताबडतोब वाय.बी. सेंटरला या, म्हणून मी येथे आलो आहे," असे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी जयंत पाटलांनी अधिक बोलण्याचे टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT