Chandrkant Khaire On Fadanvis : फडणवीसांनी आता गप्प बसावे, गद्दारांना सांभाळून त्यांची तब्यत उतरली...

Shivsena : राष्ट्रवादीला गद्दारांकडची चांगली खाती मिळाली हे बरेच झाले.
Chandrakant Khaire-Devendra Fadanvis News
Chandrakant Khaire-Devendra Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक प्रमुख व्यक्ती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचे राजकीय आणि मातोश्रीवरील वजन कमी झाल्याचे जाणवत होते. (Chandrkant Khaire On Fadanvis) पण शिंदेंच्या बंडानंतर खैरेंना पुन्हा अच्छे दिन आले. एकनिष्ठ आणि कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक अशी ओळख खैरे सांगतात. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले खैरे आता पुन्हा विरोधकांवर तुटून पडले आहेत.

Chandrakant Khaire-Devendra Fadanvis News
NCP Minister Meet Sharad Pawar : मोठी बातमी : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तसे फडणवीस आणि खैरे यांचे संबंध चांगले, पण महाविकास आघाडी सरकार पाडल्यापासून संधी मिळेल तेव्हा खैरे (Chandrakant Khaire) टीकेची संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीची सरकारमध्ये एन्ट्री आणि शिंदेंसह त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना पाठवलेली नोटीस या पार्श्वभूमीवर खैरेंनी निशाणा साधला.

केंद्रातील मोदी आणि राज्यातील या तीन इंजिनच्या सरकारला घरघर लागली आहे. (Shivsena) १६ आमदार येत्या १६ दिवसांत अपात्र होतील, लिहून घ्या, असा दावा खैरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचा संपुर्ण वेळ हा आमदार फोडाफोडी आणि गद्दारांना सांभाळण्यात जात आहे. त्यामुळे त्यांच्यी तब्यत देखील उतरली असल्याचा टोला खैरे यांनी लगावला.

फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा फडणवीसांनी आता उरलेल्या काळात लोकांची सेवा करावी, विधायक कामे करावीत, असा सल्ला देखील खैरे यांनी दिला. नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला गद्दारांकडची चांगली खाती मिळाली हे बरेच झाले. हे जाणार माहित असल्यामुळेच त्यांच्याकडची महत्वाची खाती भाजपने काढून घेतली. अजित पवारांना अर्थ खाते मिळेल, असे भाकीत मी याआधीच केले होते, असा दावा देखील खैरे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com