Chandrakanat Khaire Sarkarnama
मुंबई

मोदींनी सगळ्या यंत्रणा हातात ठेवल्यात, फडणवीसांनी रचलाय डाव : खैरेंचा आरोप!

Chandrakant Kahire : शिंदेना धनुष्यबाण मिळणार नाही. फडणवीसांचे सरकार, जर हे करत असेल, तर जनता २०२४ ला त्यांना जागा दाखवेल.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण आणि पक्षाचं शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिले. यावर आता विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. आयोगाने दिलेल्या आदेशामुळे काही दिवसात होणाऱ्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्हाचा आणि शिवसेना अशा स्वतंत्र नावाचा वापर दोन्हीही गटांना करता येणार नाही. यावर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांनीच हा सगळा डाव रचल्याचा, आरोप केला आहे.

चंद्रकांत खैरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “निवडणूक आयोग जरी स्वायत्त असले, तरी ते केंद्र सरकारच्या हाताखाली काम करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. बाकी, मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे”,असा गंभीर आरोप खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहेत.

“हे मोठं संकट आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व संयमी आहे. संघर्ष करण्याचा त्यांचा पवित्रा आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू. शिंदेंनी शिवसेना फोडली, हे फार मोठं पाप या गद्दारांनी केलं. आजपर्यंत धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसैनिकांचं मन दुखावले,” असे खैरे म्हणाले.

एकनाथ शिंदेना धनुष्यबाण मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांचे सरकार, मोदींचे सरकार जर हे सगळं करत असेल, तर जनता २०२४ ला त्यांना दाखवेल. यासगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचा हात आहे. त्यांना यासाठी मोदींचा पाठिंबा किती मिळतोय, हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं करायला नको होते”, अशा शब्दात खैरेंनी फडणवीस हल्ला चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT