डोंबिवली : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. या निर्णयानंतर आमची नविन निशाणी रिक्षा, यावर मिम्स तयार करून ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला यावरून त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाची नविन निशाणी रिक्षा असे बोलून, त्यांना डिवचले जात आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. तसेच शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही, हे ही आयोगाने स्पष्ट केले आहे. अंधेरी पोटनिवडणुकी पर्यंत हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दिला असून, शिंदे गटाचा उमेदवार नाही. यामुळे शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. तर ठाकरे गटाला हा धक्का आहे. तर याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे.
शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर समाज माध्यमावर मीन्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये "आमची नविन निशाणी रिक्षा" असा फोटो सर्वात जास्त व्हायरल होत असून तो साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला असे संबोधून डिवचले होते. मुख्यमंत्री शिंदे यांना या मुद्द्यावर समर्थन देखील मिळाले होते. त्यांनतर रिक्षावाला हा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला होता.आता ठाकरे गटाचे चिन्ह गोठवल्यानंतर आमची नवीन निशाणी रिक्षा असे मिम्स व्हायरल करून ठाकरे गटाला लक्ष केले जात आहे.
2019 च्या पालघरच्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक पक्ष महाआघाडीतला बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह गोठवून त्यांना 'रिक्षा' हे चिन्ह बहाल करण्यात आले होते. याचीच पुनरावृत्ती होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
आमदार राजू पाटील यांनीही ठाकरे गटाला फटकारले :
कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे. बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. 'त्यांची' जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती. असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही, अशा कडव्या शब्दातील बोल त्यांनी ठाकरे यांना लागवले आहेत. यासर्व घडामोडी नंतर आता अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत ठाकरे गट कोणत्या नावाने व चिन्हाने जागा लढवितो व त्यात त्यांना यश येते का, हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.