'धनुष्यबाण' गोठवल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे सूचक टि्वट, म्हणाले आमचे चिन्हं...

Milind Narvekar : नार्वेकरांना आक्रमक मुद्रेचा आणि ज्वालाग्राही वाघाचा फोटोचा शेअर केला आहे.
Milind Narvekar
Milind NarvekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. यावर शिवसेनेकडून आता विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी चिन्हं गोठल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Milind Narvekar
धनुष्यबाण चिन्हं गोठवल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया...

नार्वेकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "आमचे चिन्हं श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे.." यासोबत त्यांनी आक्रमक मुद्रेचा आणि ज्वालाग्राही वाघाचा फोटोचा शेअर केला आहे. यामुळे चिन्हं गोठवल्यानंतर आता शिवसेना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेना यामुळे अधिक चवताळली आहे, असे सकृतदर्शनी दिसत आहे. यामुळे शिवसेनेची यापुढील वाटचाल काय असेल, याचे सुतोवाच नार्वेकरांच्या ट्विटमधून दिसत आहे.

Milind Narvekar
शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर, गुन्हा दाखल : ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

दरम्यान, नार्वेकर यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसात अनेक चर्चा घडून आले होते. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नार्वेकर हे शिंदेंकडे येणार असल्याचे यापूर्वी म्हंटले आहे. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारीची जबाबदारी स्विकारून त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिले होते. आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com