Sushma Andhare, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Vaman Mhatre Sarkarnama
मुंबई

Badlapur Case : "CCTV कोणी गायब केले, वामन म्हात्रेला अटक का नाही?" बदलापूर घटनेवरुन अंधारेंचा CM शिंदे, फडणवीसांवर हल्लाबोल

Sushma Andhare On Badlapur School Crime Case : मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये रामगिरी महाराजांना भेटायला जायला वेळ आहे पण पीडित मुलीच्या घरी जायला वेळ नाही. महाराजांच्या मागे ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री, ठोकून काढा असे आदेश देणारे उपमुख्यमंत्री यांना कायद्याची चाड आहे का?"

Jagdish Patil

Badlapur School Crime Case : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहेत. मंगळवारी नागरिकांनी आंदोनल करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तर या आंदोलनामुळे दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. एकीकडे कालच्या आंदोलनातील आरोपींची धरपकड पोलिसांकडून सुरु आहे.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज बदलापुरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवायला हे दोघेच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

तसंच यावेळी त्यांनी बदलापूर (Badlapur) घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना दैनिक 'सकाळ'च्या महिला बातमीदाराला धमकी देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना अटक का केली नाही? असा सवाल देखील उपस्थित केला. बदलापूर अत्याचार घटनेवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "उरण-पनवेलची घटना ताजी आहे. वरळीत कारने महिलेल्या उडवणाऱ्या मिहिर शहाचं पुढे काय झालं हे माहिती नाही.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सपशेल अपयशी ठरले आहेत. कालच्या आंदोलनावर मुख्यमंत्री आज इथे बोलत आहेत. त्यांना याचा विसर पडका आहे की, कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारणीभूत आहेत. मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये रामगिरी महाराजांना भेटायला जायला वेळ आहे.

पण पीडित मुलीच्या घरी जायला वेळ नाही. महाराजांच्या मागे ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री, ठोकून काढा असे आदेश देणारे उपमुख्यमंत्री यांना कायद्याची चाड आहे का?," अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकारवर सडकून टीका केली.

सीसीटीव्ही फूटेज कोणी गायब केले?

दरम्यान, बदलापुरातील ज्या शाळेत घटना घडली त्या शाळेतील सीसीटीव्ही फूटेज कोणी गायब केले? ते गायब करणाऱ्यावर अद्याप पोलिसांनी तक्रार का दाखल केली नाही. 17 तारखेची घटना आहे, मात्र, एका वकिलाने ट्विट केल्यानंतर पोलिस जागे झाले. या घटनेत महिला पोलिसांनी पोक्सो अंतर्गत तक्रार घ्यायला का दिरंगाई केली? असे अनेक प्रश्न त्यांनी सरकार आणि प्रशासनावर उपस्थित केले.

वामन म्हात्रेला अटक का केली नाही?

यावेळी त्यांनी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना अटक का केली नाही असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंना विचारला. त्या म्हणाल्या, "शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतोय 'तू अशा बातम्या देत आहे, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे', असं म्हणून आंदोलन तुम्ही चिघळवलं शिंदे साहेब वामन म्हात्रेला अटक का केली नाही?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT