Eknath Shinde, T Raja Singh
Eknath Shinde, T Raja Singh  Sarkarnama
मुंबई

T Raja Singh : हिंदुत्ववादी मुख्यमंत्री शिंदेंना कोणाची भीती? टी राजा सिंह यांचा सवाल

Jagdish Patil

Thane News, 16 June : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 'चारसो पार पार' झाला असता तर भारत हिंदुराष्ट्र झाले असते, असे वक्तव्य भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी केलं. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार टी राजा सिंह हे उपस्थित होते.

या धर्मसभेत बोलताना टी राजा सिंह (T Raja Singh) अनेक प्रक्षोभक विधानं केली. तर महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या ,धर्मांतर बंदी याबाबत कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही. राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाची भीती आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारने वक्फ बोर्ड (Waqf Board) रद्द करावा, महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाकडे आहे.पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असं आवाहन देखील त्यांनी या सभेत केलं.

महाराष्ट्रातील मंदिरं सुरक्षित नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 370 किल्ले जिंकले पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर मशिद आणि दर्गे बनविण्यात आले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

वही महाराष्ट्र पर राज कारेगा

सभेत बोलताना त्यांनी हिंदी एकत्र झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही अशी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, तसेच हिंदू-मुस्लिम भाईभाई असा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद ,गो हत्या ,धर्मांतर बंदी याबाबत कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही.

राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाची भीती आहे? त्यांच्यामागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्ती केली पाहिजे. मलंगगड मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थटा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे, अशी मागणी करत 'जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा' अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT