Cabinet Expansion : विधानसभेआधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? 'या' नेत्यांची नावं चर्चेत

Mahayuti Government Cabinet Expansion : अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील लवकरच केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे युतीतील नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 June : लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. लोकसभेत महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे आता युतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोर लावला आहे. काहीही करुन मित्र पक्षातील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढावून घ्यायची नाही. यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.

अशातच आता अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील लवकरच केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे युतीतील नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागणार याची उत्सुकता आमदारांना लागली आहे.

निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि यासाठी तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच काळापासून राज्यमंत्रिपदाचा विस्तार झाला नाही. अनेक आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. तर वरिष्ठांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होऊ शकतो. तर पावसाळी अधिवेशनाआधी (Monsoon Sessions) मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं होतं. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर कोणत्या नेत्यांची वर्णी मंत्रीपदी लागू शकते याबाबतची काही नावे चर्चेत आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devyani Pharande : देवयानी फरांदेंचे दोनदा हुकलेले मंत्रिपद यंदा तरी मिळेल का?

'या' नेत्यांची नावे चर्चेत

यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून मंत्रिमंडळ वर्णी लागण्याच्या चर्चेत आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणा जगजीत सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांची नावे आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Video Vishal Patil Vs Jayant Patil : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात जाऊन विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांनी दिलं थेट आव्हान

येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल असं बोललं जात आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com