Mahayuti Government  Sarkarnama
मुंबई

CM Of Maharashtra : मुख्यमंत्री निवडीसाठी महायुतीत खलबत, अजितदादा-शिंदेंच्या आमदारांची तातडीची बैठक तर भाजपला दिल्लीतून सांगावा

Who is the Chief Minister of Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. निकालानंतर सर्वांच्या नजरा आता राज्याच्या आगामी मुख्यमंत्री कोण असणार याकडे लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गटासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग आला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 24 Nov : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. निकालानंतर सर्वांच्या नजरा आता राज्याच्या आगामी मुख्यमंत्री कोण असणार याकडे लागल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गटासह अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यात मिळालेल्या घवघवीत यशात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

यासाठी आता विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय भाजपकडून (BJP) 2 निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधिमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

तर या संदर्भात भाजपची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडूनही मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज मुंबईतील ताज हॅाटेलमध्ये बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला निवडून आलेले नवनिर्वाचीत उमेदवार उपस्थित रहाणार आहेत. तर या बैठकीत शिवसेना (Shivsena) विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असून या निवडीनंतर नवनियुक्त गटनेता सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे निवेदन प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्यांचीही आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार आहे. अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटाकडूनही विधीमंडळ नेता निवडला जाणार आहे. त्यामुळे आता राज्याचा आगामी मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्षांत जोरदार घडामोठी घडताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT