Maharashtra Assembly Election 2024 Final Result : आम्हाला अपेक्षा होती, तसा निकाल लागला नाही - शरद पवार

Maharashtra Assembly Election 2024 Final Result : अखेर महाराष्ट्रातील जनतेचा कौल समोर आला असून मतदारांनी महायुतीच्या पदरात घवघवीत यश टाकलं आहे, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला आहे. निकालानंतर सर्वांच्या नजरा आता राज्याचा आगामी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार याकडे लागल्या आहेत. तर याबाबतच आज महायुतीचे नेते नेमका काय निर्णय घेणार याबाबतच्या सर्व अपडेट जाणून घेऊया.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना

भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली.

निकालाची कारण मिमांसा करू - शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पुन्हा एकदा नव्याने उभं राहणार, अधिकृत आकडेवारी आल्यावर विश्लेषण करू, निर्णय लोकांनी दिला आहे, त्या निर्णयाचा मी अभ्यास करेन.

Sanjay Raut On Raj Thackeray Live News : तर आज चित्र वेगळं असतं - संजय राऊत

महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे, तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. हा निकाल जनतेला कौल नसून काहीतरी गडबड असल्याचा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांनी राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असं वक्तव्य केलं आहे.

CM Eknath shinde Live News : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत - सत्तार

शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा असल्याचं वक्तव्य माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. भाजप मोठा भाऊ आहे. देशात आणि राज्यात पण आहे, पण छोट्या भावाची चांगली कामगिरी पाहून जनतेच्या मनातील लोकप्रियता पाहून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Live News : अजित पवार यांची गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Asim Sarode Live News : विधानसभेच्या निकालाविरोधात वकील असीम सरोदे जाणार कोर्टात

महायुतीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे. मात्र, महायुतीला मिळालेला यश हे संशयास्पद असल्याचं सांगत पुण्यातील वकील असीम सरोदे हे कोर्टात जाणार आहेत. सरोदे म्हणाले, एवढं मोठं बहुमत महायुतीला मिळणं शक्य नाही. हा निकाल संशयास्पद आहे. तसंच जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची आपण भेट घेणार आहोत. तर या निवडणुकीत लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव नव्हता, युतीच्या नेत्यांच्या सेभेला गर्दी नव्हती मग त्यांना बहुमत कसं मिळालं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Ruat On Maharashtra CM post : शिंदेंन्या मुख्यमंत्रिपदाला विरोध 

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील निकालानंतर आता भाजपचा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यास विरोध असल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवाय याबाबतचा निर्णय दिल्लीत झाल्याची माझी माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं असून भाजपचे वरिष्ठ नेते कोणाला मुख्यमंत्रिपद देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 C.P. Radhakrishnan Live News :  निवडणूक आयोगाचे अधिकारी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार

राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे. सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु करणार आहे.

Ram Satpute Live News : रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपविरोधात काम केलं

माळशिरस विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. सातपुते यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, 'माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केलं. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी.'

Devendra Fadnavis Live News :  पुण्यात देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील आजी-माजी नगरसेवकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Marathwada Live News : मराठवाड्यात 'मविआ'चा सुपडा साफ, जरांगे इफेक्ट नाहीच

मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 46 मतदारसंघांपैकी केवळ 5 जागा मविआला मिळाल्या आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाली एक जागा मिळाली आहे. तर उर्वरीत तब्बल 40 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीचा मराठवाड्यातून सुपडा साफ झाल्याचं दिसत असून विधानसभेत जरांगे फॅक्टरही चालला नसल्याचं दिसत आहे.

Pune Politics Assembly Election Result  : नवीन आमदाराची परंपरा वडगाव शेरीमध्ये कायम

दरवेळी नवीन आमदाराची परंपरा पुण्यातील वडगाव शेरीतील मतदारांनी रायम राखली आहे. वडगाव शेरीमधून महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पठारे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार करण्याचा ट्रेंड कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. बापू पठारे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली.

2009 मध्ये बापू पठारे हे विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये वडगाव शेरी मधील नागरिकांनी मोदी लाटेत भाजपच्या जगदीश मुळीक यांना विजयी केलं. 2019 मध्ये त्यांना पुन्हा एकदा निवडून न देता, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले सुनील टिंगरे यांच्यावर इथल्या नागरिकांनी विश्वास दाखवला, यंदा पुन्हा तोच आमदार नको म्हणत बापू पठारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Shivsena MLA Live News शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक

शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईतील ताज लँड्स हॅाटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व नवनिर्वाचीत उमेदवार उपस्थित रहाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडला जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडीनंतर नवनियुक्त गट नेता सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे निवेदन प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती आहे.

CM of Maharashtra : मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग

निकालानंतर मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. विधिमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीहून केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत. विधिमंडळ नेता निवडीनंतर आणि राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे पत्र दिल्यानंतर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Final Result : राज्यात पुन्हा महायुती सरकार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून या निकालात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात आता युतीचंच सरकार येणार हे निश्चित झालं आहे. तर आता आगामी मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच नाव चर्चेत आहे. शिवाय त्यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com