Chhagan Bhujbal News  Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal On NCP Crisis: राष्ट्रवादी का फुटली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण..; सातत्याने शब्द फिरवल्यामुळे...

Maharashtra NCP Crisis: "आम्ही हा निर्णय का घेतला?"

सरकारनामा ब्यूरो

Rashtrawadi Crisis Live News Updates : दोन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्यासह आठ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्या घडामोडींचे कवित्व अजून संपलेलं दिसत नाही. आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी "आम्ही हा निर्णय का घेतला?" याबाबत भाष्य केलं. मुंबईतील पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

"सातत्याने कुणी शब्द फिरवत असेल तर त्यांच्याबाबत राग येणं स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीत सातत्याने या गोष्टी घडत गेल्या. अजित पवार यांनी याबाबत उघड वाच्यता केली. मीही त्यावर बोललो आहे, ..आमच्यावर सगळ्याचे प्रेम असतं तर हे घडलचं नसते," अशा शब्दात भुजबळांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला.

"महिनाभरात अनेक बैठका झाल्या, या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील हेही या बैठकांना उपस्थित होते. प्रमुख नेता, आणि वक्ता म्हणून मी काम करीत होतो. शेवटपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सूचना करुन काहीच होत नाही हे लक्षात आले. कोणताही मार्ग दिसत नसल्याने मी हा निर्णय घेतला," असे भुजबळ म्हणाले.

"कायदेशीर बाबी तपासल्यानंतर आम्ही शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावे, अशी विनंती केली आहे. याबाबत याचिका दाखल केली असून यात अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे नमूद केलं आहे. आम्हाला अपात्रेची भीती नाही," असा विश्वास भुजबळांनी यावेळी व्यक्त केला.

ती हिंदुस्तान टूर..

भुजबळ म्हणाले, "वर्षभरापूर्वीची गोष्ट वेगळी होती. ती हिंदुस्तान टूर झाली होती. पण आम्ही इथल्या इथे राहून निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाने मागील केसमध्ये केलेली उकल त्यासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण आम्ही या सगळ्यांचा अभ्यास अजित पवार यांच्या नेतृत्वात केल्यानंतर सरकारमध्ये जायचं ठरलं. वेगवेगळे कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT