Mumbai News, 13 Feb : कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
मात्र, पक्ष प्रवेश होण्याआधी आपण शिंदेंसोबत का जात आहोत? याबाबतचं स्पष्टीकरण राजन साळवी (Rajan Salvi) यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मी कोकणात, रत्नागिरीत काम केलं. नगरसेवक, जिल्हा प्रमुख ते राजापूर विधानसभेचा आमदार असा माझा राजकीय प्रवास आहे.
मी मतदारसंघातून अनेक वेळा विजयी झालो. माझी वाटचाल चांगली होती. मात्र, 2024 च्या निवडणुकीत मी पराभूत झालो. त्या पराभवाला जे कारणीभूत आहेत. त्यांची नावे मी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कानावर घातली आणि त्यानंतर मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."
शिवाय मी उद्धव ठाकरेंसमोर माझ्या भावना व्यक्त केल्यानंतरच मी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून भविष्यात एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली काम करू असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, विनायक राऊतांनी पैसे घेऊन निलेश राणेंचं काम केल्याच्या आरोपावर त्यांनी उत्तर दिलं.
साळवी म्हणाले, "मी शिवसेनेत (Shivsena) 40 वर्षे काम केलं. मागील काळांमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादीने जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं. मी काय चुकीचं केलं म्हणत असतील तर माझ्या सहकाऱ्यांना विचारा." "आमच्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेना असे तीन पक्षाचे पर्याय होते. मात्र, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह असल्यामुळे मी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंनी जो विकास कामांचा धडाका लावला आहे. तो पाहून मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे", असं ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.