Aaditya Thackeray : "स्वत:च्या स्वार्थासाठी..."; उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींवर आदित्य ठाकरे बरसले

Rajan Salvi Joins Eknath Shinde's ShivSena : आदित्य ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर सडकून टीका केली.
Rajan Salvi, Eknath Shinde, Aditya Thackeray
Rajan Salvi, Eknath Shinde, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News, 13 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नेते आदित्य ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर सडकून टीका केली.

"पळून जाणारे जय गुजरात, जय भाजप करतायत. जय महाराष्ट्र नाही. केसेस असल्यानं, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जाणारे जय महाराष्ट्र बोलू शकत नाही"; अशा शब्दात त्यांनी साळवी यांच्यावर हल्लाबोल केला.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. साळवी यांचं शिंदे गटात जाणं उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनंतर एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Rajan Salvi, Eknath Shinde, Aditya Thackeray
Shivsena Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंनाच नव्हे तर राज ठाकरेंनाही धक्का, शिंदेसेनेत इन्कमिंग सुरूच

तरीही अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाकरे गट चांगलंच भडकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच स्वत:च्या स्वार्थासाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने पक्ष सोडणारे जय महाराष्ट्र नव्हे तर जय गुजरात म्हणू शकतात, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) साळवी यांच्यावर टीका केली.

पवारांना भेटणार नाही

दरम्यान, यावेळी आदित्य यांनी सांगितलं की, काल रात्री राहुल गांधी यांची भेट घेतली असून आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ठाकरे गटाच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, शरद पवारांनी (Sharad Pawar) एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणी कुणाचं कौतुक करावं हा त्याचा विषय आहे.

Rajan Salvi, Eknath Shinde, Aditya Thackeray
Jyotiraditya Shinde : "बाळासाहेबांचा आदर्श लाथाडून..."; महादजी शिंदे पुरस्काराबाबत केलेल्या वक्तव्यावरून ज्योतिरादित्य शिंदेंचा राऊतांवर हल्लाबोल

राऊत बोलले ते अधिकृतच

त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याचं पाप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे, असं म्हणतच आपण आज शरद पवारांना भेटणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका अधिकृत नाही अस कोणी सांगितल का? असा सवाल करत ते बोलले तीच ठाकरे गटाची भूमिका असल्याचंही आदित्य यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com