Mumbai University Senate Election  Sarkarnama
मुंबई

Mumbai Senate Elections: सिनेट निवडणूक स्थगित का केली ? उच्च न्यायालयाचा सवाल; ३ ऑक्टोबरला होणार फैसला ?

Mumbai University Senate Election : राजकीय दबावातून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला.

Ganesh Thombare

Mumbai News: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली. या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेत ही सिनेट निवडणूक स्थगित का करण्यात आली ?, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

राजकीय दबावातून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला. मात्र, याबाबत सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदार याद्यामधील तफावतीसंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने न्यायालयामध्ये दिली. याबरोबरच ही समिती २९ सप्टेंबरपर्यंत याबद्दलचा अहवाल सादर करणार असल्याचेही विद्यापीठाने सांगितले. यानंतर आता ३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे यावर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई विद्यापीठाकडून ९ ऑगस्टला सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १० सप्टेंबरला सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि १३ सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार, अशा तारखादेखील विद्यापीठाकडून जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ही निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली. ही निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT