MU Senate Election : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती; कारण मात्र गुलदस्त्यात..

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाकीडून सिनेट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र
Mumbai University
Mumbai UniversitySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुका अचानकपणे स्थगित केल्या आहेत. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे आता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मागील आठवड्यात ९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता तडकाफडकी या निवडणुका स्थगित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Mumbai University
Mumbai Goa Highway: राज ठाकरेंनी पाठ फिरवताच मनसैनिकांनी फोडले मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे ऑफिस

मुंबई विद्यापीठाने यापूर्वी जाहीर केलेल्या सिनेट निवडणुकांमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 18 ऑगस्ट 2023 अशी अंतिम मुदत देण्यात आली होती. तर १३ सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार होता. मात्र ऐनवेळी या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय पक्ष, तसेच विद्यार्थी संघटनांकडून या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र आता निवडणुकाच स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Mumbai University
NCP News : नवाब मलिक यांनी राजकीय संकेत दिलेच नाहीत !

निवडणुका स्थगितीचे कारण काय?

या निवडणुका जाहीर करणाऱ्या मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषेदेने अचानकपणे निवडणुकांना स्थगिती दिली. मात्र स्थगिती देण्याचे कारण अजूनही स्पष्ट केले नाही. निवडणुका स्थगितीबाबत काढलेल्या परिपत्रकामध्ये कोणतेही ठोस कारण दिले गेले नाही. शिवाय यामागचे कारणही परिषेदेने माध्यमांना सांगितले नाही, त्यामुळे या घेतलेल्या निर्णयावर जोरदार चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com