Uddhav Thackeray-Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांनी एकाच शब्दात विषय संपवला....

Shivsena UBT-BJP Alliance : विधीमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लागोपाठ दोन भेटी झाल्या होत्या. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 22 March : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या. तसेच, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वाटपावेळी जे काही नाराजीनाट्य घडले. त्याचवेळी दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटी, आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या फडणवीसांच्या भेटी यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का, ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा रंगली होती. त्या सर्व शक्यतांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी एकाच शब्दात उत्तर देत विषय मिटवून टाकला आहे.

मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमधील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते. विधानसभेच्या निवडणुका त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढविण्यात आल्याने शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची इच्छा होती. मात्र, भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेल्या जागा पाहता भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही साधारण चित्र होते आणि झालेही तसेच. पण त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज झाले हेाते.

मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर शिंदेंनी गृहमंत्रिपदावर दावा सांगितला होता. मात्र, गृहमंत्रिपदाबरोबरच महसूल मंत्रिपदही शिवसेनेला देण्यात आले नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी आले होते, त्यांच्या नाराजीचा चर्चा त्या वेळी महाराष्ट्रभर झाला होती. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असताना दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये योगायोगाने भेटी घडत गेल्या. त्यातून २०१९ त्या फाटाफूटीनंतर निर्माण झालेली कटूता कमी होण्यास मदत झाली.

विधीमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लागोपाठ दोन भेटी झाल्या होत्या. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. तर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस हे एकदा जवळ येणार अशी चर्चा सुरू झाली होती.

त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच शब्दात उत्तर त्याबाबतचा विषय मिटविला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर फडणवीसांच्या उत्तराने पडदा पडला आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT