Anurag Thakur News : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे आज (दि. १४ फेब्रुवारी) एक दिवसाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान कल्याणमधील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यापूर्वी देखील ठाकूर सप्टेंबरमध्ये तीन दिवस या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते.
भाजपने देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. ठाकूर यांचा हा दुसरा कल्याण दौरा असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरं तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार सत्तेत आहे. असं असूनही या मतदारसंघात अनुराग ठाकूर यांची ये-जा वाढली आहे. या माध्यमातून भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केल्याने आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अनुराग ठाकूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंचा आहे. या ठिकाणी भाजपचा दुसरा दौरा होत असून येथे भाजप (BJP) दावा ठोकणार आहे का? या ठिकाणी कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे का? असे प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारले.
त्यावर उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ''येथून कोण निवडणूक लढणार? येथील उमेदवार कोठे जाणार? याची चिंता तुम्ही करु नका. आम्ही एकत्रितच लढू आणि जोरदार लढू. तसेच आधीपेक्षा जास्त विजय संपादन करु,'', असे ते म्हणाले.
तसेच अनुराग ठाकूर यांनी संजय राऊतांवरही टीका केली. याआधी राऊत म्हणाले होते की, ''जगात सात आश्चर्य आहेत, त्यातील दोन दिल्लीत बसले आहेत. तर महाराष्ट्रात दहावे आश्चर्य असून फडणवीस हे दहावे आश्चर्य आहेत'', असे वक्तव्य राऊतांनी केले होते. त्यावर बोलताना ठाकूर म्हणाले, ''त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा त्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर चर्चा केली तर बरे होईल'', असं म्हणत त्यांना टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.