मुंबई : आगामी २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे पुढची चर्चा आहे. ती आता करणे मला संयुक्तीक वाटत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) काय बोलावे, यावर माझे नियंत्रण नाही. आम्ही लोकांना पटणारी भूमिका घेऊन हे सरकार स्थापन केले आहे. आमचे सरकार यशस्वी होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे, अशा शब्दांत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे(Satyajeet Tambe) यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसचे वाढते महत्त्व पाहता पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करेल का? या प्रश्नावर उत्तर दिले. (Will Congress claim the post of Chief Minister in 2024? Satyajit Tambe said ...)
महाविकास आघाडीला(Maha Vikas Aghadi) सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. त्या कार्यक्रमात सत्यजित तांबे बोलत होते.
तांबे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जो किमान समान कार्यक्रम हाती घेतला आहे, त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे, हे आम्हाला पाहावे लागेल. सर्वांना आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमचा काँग्रेस पक्ष वाढविणाचे काम करत आहोत. मुख्यमंत्रीपदाबद्दल मात्र त्या त्या वेळी चर्चा करणे गरजेचे आहे. सध्या त्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही.
मला हा सर्व्हे समाधानकारक वाटतो आहे. राज्यातील लोकांना दिलासा देणारे महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे त्यातून वाटते. यापुढील काळामध्ये आम्हाला आमची भूमिका सिध्द करता येणार आहे. ज्या निवडणुका होणार आहेत, त्यात काय घडामोडी घडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, असेही तांबे यांनी स्पष्ट केले.
सर्व्हे पाहता महाविकास आघाडी सरकार जनतेच्या अपेक्षाप्रमाणे काम करणारे आहे, हे दिसून आले आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारचे काम उत्तम असल्याची पोचपावती या सर्व्हेतून आम्हाला मिळाली आहे. कारण, या दोन वर्षांतील दीड ते पावणे दोन वर्षे कोरोना महामारीतच गेली आहेत, असेही सत्यजित तांबे म्हणाले.
मला कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी जी आंदोलने केली ती मला महत्वाची वाटतात. ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, ते भाजपचे नेते म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढलो. हे म्हणणे हास्यास्पद आहे. देशात अनेक समस्या असूनही भाजपला शंभराच्यावर जागा मिळत असतील तर ते मोठे दुर्दैवी ठरेल, अशी टीकाही सत्यजित तांबे यांनी भाजपवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.