Devendra Fadnavis-Jayant Patil
Devendra Fadnavis-Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil Challenge To Fadnavis : जयंत पाटील असं का म्हणाले,‘... तरच आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये खरंच दम आहे.’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माझे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान आहे की, फडणवीस यांनी आज अथवा उद्यापर्यंत किंवा येत्या ४८ तासांत ठाणे शहरातील पोलिस आयुक्तांपासून सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालवावं. मग, आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये खरंच दम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलिस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेवू, असे खुले चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीस यांना दिले. (Will Devendra Fadnavis accept Jayant Patal's challenge?)

जयंत पाटील हे ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, विरोधात बोलणाऱ्या महिलेला मारहाण करणं, असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नव्हती. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना मारहाण करणे, हे अत्यंत गंभीर प्रकार आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्या महिलांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच, ठाण्यातील पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना पोलिस संरक्षण द्यावे.

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्याशिवाय काही होत नाही. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. पण, ठाणे जिल्हा आणि शहर हे त्यांच्या अधिकारात नाही. ठाणे जिल्ह्याची सध्याची कायदा व सुव्यवस्था पाहिली, तर माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की, फडणवीस यांनी आज अथवा उद्यापर्यंत किंवा येत्या ४८ तासांत ठाणे शहरातील पोलिस आयुक्तांपासून सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात घालवावं. मग आम्ही समजू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये खरंच दम आहे. एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलिस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेवू, असेही पाटील म्हणाले.

भाजपला जळी, स्थळी, काष्टी राष्ट्रवादीशिवाय काही दिसत नाही. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, त्यामुळे कोणताही आरोप करायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसवर करावा, असे आदेश, सूचना आमच्या विरोधी पक्षात दिलेल्या दिसत आहेत, असेही पाटील यांनी नमूद केले.

आमदार पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरची दंगल कोणी केली. दंगलीच्या अगोदर स्कूटरवर फिरणारी मुलं कोण आहेत. दंगलीच्या ठिकाणी नेमकी कोणावर दगडफेक केली. याबाबतची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून लवकर पुढे आणावी. त्यातून जे उत्तर मिळेल, ते खासदार अनिल बोंडे यांना अवघड जाईल. त्यावेळी बोंडेंनाच कळेल की ही लोकं तर सगळी आपल्या ओळखीची आहेत. हे बोंडेंना अनुभवायला मिळेल.

सीसीटीव्हीत जे जे दिसत आहेत, त्यांना पोलिसांनी अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय काही लोकांचा दिवसच जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्याचे टार्गेट त्यांना दिले असेल, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर असा आरोप केला असेल, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT