Karnataka Assembly Election : भाजपत वाद पेटला : विधान परिषद आमदार राजीनामा देऊन ईश्वरप्पांविरोधात निवडणूक लढवणार

ईश्वरप्पा किंवा त्यांचा मुलगा के. ई. कांतेश यांना शिमोगामधून निवडणूक लढवू द्या. मी त्यांना आव्हान देईन.
K. S. Eshwarappa-Manjunath
K. S. Eshwarappa-ManjunathSarkatrnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात (BJP) वाद पेटला आहे. निवडणुकीत उमेदवारीवरून बंडखोरी होणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण, भाजपचे ज्येष्ठ नेते अयानूर मंजुनाथ यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन ता. १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिमोगा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. हे एक प्रकारे शिमोग्याचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांना थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे. (BJP MLA Manjunath will contest assembly elections against Eshwarappa)

के. एस. ईश्वरप्पा हे भाजपमधील बडे प्रस्थ मानले जाते. शिमोगा हा ईश्वरप्पांचा पारंपारिक मतदारसंघ आहे, त्यामुळे अयानूर मंजुनाथ यांचे हे आव्हान थेट ईश्वरप्पा यांनाच असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान आमदार असूनही त्यांनी बंडाची भाषा केल्याने भाजपतील असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

K. S. Eshwarappa-Manjunath
Market Committee Election : माढ्यात शिंदे बंधूंच्या एकहाती वर्चस्वाला सावंत बंधूंचे कडवे आव्हान : संजय शिंदे, कोकाटेंसह दिग्गजांनी भरले अर्ज

अयानूर मंजुनाथ यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की कोणत्या राजकीय पक्षाकडून हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. ते पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते आणि त्यांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपत आहे.

K. S. Eshwarappa-Manjunath
Indapur Market Committee Election: इंदापुरात आमदार माने, माजी सभापती जगदाळे, फडतरे, भरणेंच्या बंधूंसह मातब्बरांचा शड्डू

शिमोगा येथील पत्रकार परिषदेत बोलताना मंजुनाथ म्हणाले की, मी माजी मंत्री आणि भाजप आमदार के. एस. ईश्वरप्पा यांच्या विरोधात निवडणूक लढवून माझी ताकद दाखवून देईन. मला भाजप नेत्यांना या वेळी संधी द्यावी, अशी विनंती मी अनेकदा केली आहे. मात्र, माझ्या विनंतीला मान देण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही प्रमुख नेत्यांच्या मुलांची नावे तात्पुरत्या यादीत आहेत. ईश्वरप्पा किंवा त्यांचा मुलगा के. ई. कांतेश यांना शिमोगामधून निवडणूक लढवू द्या. मी त्यांना आव्हान देईन.

K. S. Eshwarappa-Manjunath
Indapur Market Committee : हर्षवर्धन पाटील इंदापूर बाजार समितीची निवडणूक न लढविण्याचे हे आहे कारण....

निवडणुकीपूर्वी शहरातील शांतता बिघडवण्याचा कट रचला जात आहे. अशा प्रयत्नांबद्दल शहरातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही मंजुनाथ यांनी केले आहे. भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा शिमोगा भेटीवेळी ईश्‍वरप्पा यांनी आदर केला नाही. त्यांच्या या वागण्याने जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे, असेही मंजुनाथ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com