Amravati News : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप ( Maharashtra Cabinet Expansion) याबाबत एकच चर्चा सुरू आहे. काही आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार बच्चू कडू मात्र आपल्या मतदारसंघातच आहेत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कडू यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारला इशाराच दिला आहे. (Latest Marathi News)
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. "आपण आज ११ वाजता आपली पुढील वाटचाली संदर्भातली भूमिका जाहीर करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. यामुळे आता मंत्रीपदावरून नाराज असलेले बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेणार? सरकारला दिलेलं समर्थन बमागे घेत, ते बाहेर पडणार का? अशा चर्चांना उधाण येत आहे.
दरम्यान, मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता असलेल्या संभाव्य आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोन संबंधित आमदारांना गेल्याची चर्चा आहे. बच्चू कडू यांनाही फोन आल्याचे त्यांनी सांगितले.
यालंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तारासाठी मला फोन आला आहे. आज ११ वाजता मंत्रिमंडळात सामील होणार की नाही, याबाबत भूमिका जाहीर करणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.