Mla Dhas-Ajabe News : साठवण तलावाच्या निवदेवरून आमदार धस, आजबेंमध्ये जुंपली..

Beed News : गेल्या वर्षभरात आपण वेळोवेळी शासनाकडे खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाबाबत पाठपुरावा केला.
Mla Dhas-Ajabe News
Mla Dhas-Ajabe News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : कृष्णा मराठवाडा प्रकल्पा अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना खुंटेफळ साठवण तलावाच्या निविदेवरून आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे व विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. (Mla Dhas-Ajabe News) राज्यात मागील वर्षी सत्तांतरानंतर या प्रकल्पाच्या निविदेवरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. आता अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्याने राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

Mla Dhas-Ajabe News
Abdul Sattar News : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती, सत्तारांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश..

आजबे हे फुटीर गटाबरोबर असून, दोन्ही आमदार एकाच गटात आले असताना दोघांमध्ये पुन्हा खुंटेफळ तलावावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Suresh Dhas) दोन्ही आमदारांनी खुंटेफळ तलावाबाबत पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. बाळासाहेब आजबे (Balasheb Ajabe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पाईपलाईन कामाच्या निविदेवरील स्थगिती उठविण्याबाबत नुकतेच पत्र दिले.

याबाबत आमदार सुरेश धस यांनी काल (मंगळवार) पत्रकार परिषद घेत आजबे हे जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत, असा आरोप केला. (Beed News) धस म्हणाले की, आजबेंनी महाविकास आघाडीच्या काळात ३२ महिन्यांत खुंटेफळ साठवण तलावासाठी एक गुंठा देखील भूसंपादन केलेले नाही. त्यांनी फक्त शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट पाईपलाईन कामाचे सर्वेक्षण केलेले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात काढलेले पाईपलाईन कामाचे टेंडर सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता काढण्यात आल्याने ते चुकीचे आणि नियमात बसत नसल्यामुळे आपण निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. तथापि, राज्य शासनाने या योजनेच्या निविदेबाबतची सर्व कागदपत्रे तपासली व फेब्रुवारी २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या योजनेची स्थगिती उठवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

गेल्या वर्षभरात आपण वेळोवेळी शासनाकडे खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाबाबत पाठपुरावा केलेला असून सन २०२१ पासून प्रलंबित असलेला भूसंपादन निवाडा आणि दर निश्चित करण्यासाठी फेब्रुवारीत जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेऊन निवाडा निश्चित केला. त्यानंतर भूसंपादनासाठी ३५ कोटी रुपये मंजूर करून त्यातील १७ कोटी रुपये शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. तसेच उर्वरित मावेजासाठी देखील वारंवार प्रयत्न केलेले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना उर्वरित मावेजा मिळणार आहे, असे धस म्हणाले.

Mla Dhas-Ajabe News
Ambadas Danve News : महिला, मुलींवरील अत्याचार वाढलेत लक्ष द्या, तरुणाने रक्ताने लिहले पत्र..

प्रकल्पांतर्गत शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट पाईपलाईन योजनेसाठी आता सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याने येत्या पंधरा दिवसात या योजनेची बी-1 निविदा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपण १८ आॅगस्ट २०२२ रोजी पत्र देऊन आष्टी उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधीची भरीव तरतूद करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार आष्टी येथील अहमदनगर ते आष्टी या रेल्वेसेवा शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेसाठी धस यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असून त्यांच्या मागणीनुसार केवळ ११ दिवसांत ४ ऑक्टोबर २०२२ रोजी या आष्टी उपसा सिंचन योजना प्रकल्पासाठी ११ हजार ७२६ कोटी रुपये निधी मंजुरीची घोषणा केली. त्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी २८०० कोटी मंजूर करण्यात आल्याचे घोषित केलेले आहे, असेही धस यांनी सांगितले.

Mla Dhas-Ajabe News
Bhumre-Sattar News : तीर्थक्षेत्र विकास निधीतही मंत्र्यांना झुकते माप...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुंटेफळ योजनेचे जनक असल्याचा उल्लेख धस यांनी केला. त्यांनी या योजनेचा समावेश करून प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे आणि दुसरी प्रशासकीय मान्यता ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या योजनेचे जनक व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपसा सिंचन योजनेला मूर्त स्वरूप दिले आहे.

सध्या या योजनेसाठी ५० कोटी मंजूर झाले असून आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये आणखी ४०० कोटींची भरीव तरतूद करण्याची मागणी आपण केली आहे. सध्या १.६८ टीएमसी पाणी मंजूर झालेले आहे. परंतु मराठवाड्याच्या वाट्याचे एकूण ५.६८ टीएमसी पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट पाईपलाईन योजनेची किंमत एक हजार कोटींपेक्षा जादा असल्याने ऑनलाईन बी- 1 निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निविदेसाठी देशपातळीवर स्पर्धा होईल. त्यामुळे दर्जेदार काम होईल, असा विश्वास धस यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com