Sanjay Raut, Amit Shah, Narendra Modi, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

BJP Politics : भाजप 'मविआ'चे खासदार फोडणार? 'ऑपरेशन लोटस'ची राऊतांना धास्ती तर बावनकुळेंनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले...

BJP Operation Lotus to Break MVA MPs : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र सुपडासाप झाला आहे. विधानसभेतील अपयशामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह आमदार, खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 11 Dec : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र सुपडासाप झाला आहे. विधानसभेतील अपयशामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह आमदार, खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे.

अशातच आता भाजप (BJP) महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. कारण भाजपकडून राज्यात महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' राबवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेतील दारुण पराभवानंतर आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच ते राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली होती.

त्यामुळे आता भाजप राज्यात 'ऑपरेशन लोटस' राबवणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. तर या चर्चांमुळे आघाडीच्या नेत्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. अशातच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाडणार अशी जाहीर वक्तव्य करणारे शिवसेना ठाकरे गटाते खासदार यांनी देखील 'ऑपरेशन लोटस'वर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडण्याचं काम करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारखे लोक का त्यांच्यासोबत भीतीपोटीच गेले आहेत.

ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही? असं म्हणत त्यांनी भाजप ऑपरेशन लोटस करू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच आधीही भीती दाखवून नेत्यांना पळवायचं आणि भाजपसोबत गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे, जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. असे यांचे धंदे सुरू आहेत. त्यामुळे आता भाजपकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार दिसत नसल्याचंही राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील 'ऑपरेशन लोटस'च्या चर्चा खऱ्या असल्याचे संकेत दिले आहेत. ऑपरेशन लोटस संदर्भात प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, "काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांचे निवडून आलेले खासदार सांभाळता येत नाही.

शिवाय काँग्रेसमध्ये राहून पुढे काही भवितव्य नाही असं त्यांच्या खासदारांना वाटत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे काही लोक अस्वस्थ असून पुढे काय करायचं ते बघू"; असं म्हणत ऑपरेशन लॉटस करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT