Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News : मराठा आरक्षणावर आज मोठा निर्णय होणार? सरकारकडून हालचालींना वेग!

Chetan Zadpe

Manoj Jarange : मराठा आरक्षणचा प्रश्न गंभीर बनला असून, राज्यात अनेक ठिकणी या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले. मराठा समाजातील तरूण आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरत आहेत.

अनेक बीड व राज्यातील इतरही काही ठिकाणी मराठा आंदोवनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. अनेक राजकीय नेते, कार्यालयांवर हल्ले होत आहेत. आता हे आंदोलन आणखी जास्त चिघळू नये, यासाठी सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

(Latest Marathi News)

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

बैठकांचा धडाका -

दरम्यान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही 'सागर'वर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकिनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले.

वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यातही बंदद्वार चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली आहे. अशातच मंत्रीमंडळाच्या बैठकीत न्या.

शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजुरी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री - राज्यपाल भेट -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) यांनी काल सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले आहे. याचदरम्यान, पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) भेटीत मराठा आरक्षण, आंदोलनावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT