Crime  Sarkarnama
मुंबई

मुलीचं व्हॉट्स अॅप स्टेट्स बेतलं आईच्या जीवावर; मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मृत्यू

सरकारनामा ब्युरो

पालघर : व्हॉट्स अॅपवरील (WhatsApp) अनेक मेसेजमुळे वाद निर्माण झाल्याचे प्रकार दररोजच घडतात. त्यावरून राजकारणही तापतं. पोलिसांकडून (Police) असे मेसेज पाठवणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. पण मुलीच्या व्हॉट्स अॅप स्टेट्समुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्टेट्सवरून गैसमज निर्माण झाल्यानंतर काही जणांनी संबंधित महिलेला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Crime News)

लिलावती देवी प्रसाद असं या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या 48 वर्षांच्या होत्या. त्यांच्या 20 वर्षीय मुलीने व्हॉट्स अॅप स्टेट्सवर एक मेसेज पोस्ट केला होता. तिच्या मैत्रिणीला हा मेसेज तिच्याबद्दल असल्याचे वाटले. त्यावरून वाद झाल्याचे बोईसह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम (PI Suresh kadam) यांनी सांगितले. कदम यांनी पोस्टमध्ये नेमका कोणता मजकूर होता याची माहिती दिली नाही.

कदम यांनी सांगितले की, 10 फेब्रुवारी रोजी मैत्रिणीची आई, भाऊ-बहीण शिवाजीनगर येथील लीलावती देवा प्रसाद यांच्या घरी गेले. त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये प्रसाद यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

आपल्या व्हॉट्स अॅप स्टेट्सवरील मेसेस मैत्रिणीसाठी नव्हता, असे प्रसाद यांच्या मुलीने रविवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तिच्या मैत्रिणीच्या आईसह कुटुंबातील इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक न्यायालयासमोर सादर केल्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT