Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News: पक्ष बांधणीसाठी जोमाने कामाला लागा; जयंत पाटलांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

NCP News: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पक्ष कार्यालयात मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी शरद पवारांचा गट अॅक्शन मोडवर आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पक्ष कार्यालयात मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात येणार असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पक्ष अधिक बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणुका आणि इतर निवडणुका या महाविकास आघाडीतच होतील, अशी शाश्वतीही पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रत्येकाने चोख पार पाडा, तसेच पक्ष बांधणीसाठी बुध बांधणीवर जास्त भर द्या, अशा सूचनाही पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकिला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लवकरच शरद पवार राज्यभर दौरा करणार असून ते बीड मतदारसंघातून दौऱ्याची सुरवात करणार आहेत. आठवड्याला दोन जिल्हे फिरून पवार हे १२-१५ विधानसभा मतदारसंघांत जाणार आहे. या दोऱ्यात ते पक्षातील बंड केलेल्या नेत्यांबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या दौऱ्यात ते पक्षातील पदाधिकाऱ्यांवर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या देतात का, ते देखील पाहणं महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT