Yashomati Thakur News Updates,  Sarkarnama
मुंबई

Yashomati Thakur Tweet After Death Threats : 'दाभोळकर असाच ओरडत होता..जन्नतमध्ये पाठवेन,' या धमकीनंतर यशोमती ठाकूरांचं Tweet

Sambhaji Bhide News Update : उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीऱ्याने लक्ष दिले पाहिजे,"

सरकारनामा ब्यूरो

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक होऊन त्यांच्यावर कारवाईचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांना धमकी दिली गेली; त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना आलेल्या धमकीची भर पडली.या धमक्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झडले. धमकीला न डगमगता यशोमती ठाकूरांनी धमकवणाऱ्या शक्तीला "काँग्रेस कशासाठी.." अशी पोस्ट टि्वट केली आहे.

संभाजी भिडे प्रकरणात ‘असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू’, अशी धमकी यशोमती ठाकूर यांना देण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीवर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीऱ्याने लक्ष दिले पाहिजे,"

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तर भिडेंवर संताप व्यक्त केला आहे. भिडे यांना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

"या देशात दंगे-धोपे होऊ नयेत, द्वेषापोटी हिंसा होऊ नये, कुणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये कुणाचीही ढवळाढवळ असू नये, सगळ्यांना उपासनेचा अधिकार असावा, राज्यघटनेचं योग्य रितीने पालन व्हावं, या देशासाठी काँग्रेसचं हे व्हिजन आहे," असे ठाकूर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"केवळ पायाभूत सुविधांचा विकास नाही तर या देशातील सर्व भागांचा विकास व्हायला पाहिजे हे आमचं धोरण आहे. मला वाटतं या देशातील सर्व तरूणांनी द्वेषाच्या राजकारणापासून या देशाला मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट केले पाहिजेत," असे आवाहन त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT