Nawab Malik sarkarnama
मुंबई

होय, मी भंगारवाला... पण माझ्या नादी लागू नका`

भाजप नेत्यांचे अनेक कारनामे विधीमंडळाच्या अधिवेशनात उघड करणार असल्याचा मलिक (Nawab Malik) यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज भाजप नेत्यांवर जोरदार प्रहार केले. मलिक यांची संभावना भंगारवाला म्हणून केली जाते. या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. होय, मी भंगारवाला आहे. पण तो कोणाचं पाणी पाणी करेल, हे आता लोकांना कळालं असेल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच आगामी काळात भाजपचा पोपट बनलेल्या समीर वानखेडे यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

भाजप नेते मोहन भारतीय यांनी मलिक यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ही मंडळी माझी किंमत वाढवत आहेत. माझी सगळी संपत्ती विकली तरी एवढी रक्कम जमणार नाही. मी भंगारवाला आहे, अशी ही टीका ही मंडळी करत असतात. होय, मी भंगारवाला आहे. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले.

मी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा करत आहे. माझे माझ्या घराशेजारीच गोडाऊन आहे. पण मी सांगू इच्छितो की माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही. मी मुंबईत सोन्याची तस्करी केलेली नाही. मी खोटेनाटे करून बँकेचे पैसे खाल्लेले नाहीत. माझ्यावर कधी इन्कम टॅक्सची रेड पडली नाही, अशा शब्दांत त्यांनी भारतीय यांना टोला लगावला. भंगारचा धंदेवाला काय करतो? तर जी बिनउपयोगाची वस्तू किंवा लोखंड आहे ते वितळवतो आणि त्याचे पाणी पाणी करतो. आता या नेत्यांनाही कळाले असेल की एका भंगारवाल्याचे नादी लागणे किती अवघड आहे ते, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी भूमिका मांडली.

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या आम्ही मराठी म्हणून आमच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन करत आहेत. गुन्ह्यातून बचावासाठी मराठीपणाच्या नावाखाली संरक्षण मागणे योग्य आहे का? त्यांना या कामासाठी मराठी म्हणून कोणी थारा देणार नाही. मी पण मुंबईत साठ वर्षे राहतो आहे. मी पण महाराष्ट्राचा आहे. मी मराठी माणूस आहे, असेही मलिक यांनी या वेळी जाणीवपूर्वक सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT