आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले..

आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) जामीन मंजूर झाला आहे.
Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई: क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आज (ता.28 ऑक्टोबर) आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) जामीन मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करत 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' अशी एका वाक्यात सुचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Nawab Malik
रामदास आठवलेंचे आर्यन खानला समर्थन

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना आज जामीन मंजूर झाला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबरला सकाळी एनसीबीने (NCB) ताब्यात घेतले होते. अटकेनंतर तिघांनाही २५ दिवसानंतर जामीन मिळाला आहे. आर्यन खान प्रकरण व क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मलिक यांनी आर्यनला जामीन मिळल्यानंतर फिल्मी स्टाइलमध्ये ट्विटरवरुन सुचक प्रतिक्रिया दिली आहे. आज आर्यनला पाच वाजताच्या सुमारास जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांनी लगेचच 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असं ट्विट केले.

Nawab Malik
आर्यन खान ड्रग्जचे नियमित सेवन करायचा : एनसीबीचा कोर्टात दावा

दरम्यान, वानखेडे यांनी मुस्लिम असल्याची माहीती लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मंत्री मलिक यांनी केला आहे. यावर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळत याबाबतचे उत्तर आपण न्यायालयातच देऊ असे म्हटले आहे. मात्र, आज आर्यनला जामीन मिळाल्यावर केलेल्या ट्विटरवरुन मलिक आणि वानखेडे यांचा वाद थांबणार नसुन वाढतच जाणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com