Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : सूरतेच्या लुटीचा बदला; आदित्य ठाकरे म्हणाले, 'गद्दार शिंदेंची मजा अन् मुंबईकरांना..!'

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजलाय. सर्वांनी आपल्या शब्दांच्या धार वाढवल्यात. कोण कधी कोणता मुद्दा कोणत्या शब्दांच्या बाणांनी मांडेल याचा भरवसा नाही. या निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष लागले आहे, ते म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईतील मतदार संघाकडे! इथं थेट 'शिवसेनाविरुद्ध शिवसेना', असा सामना रंगणार आहे.

म्हणजेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईसाठी मैदानात उतरले असून, प्रत्येक मुद्यावर आक्रमकपणे भाष्य करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबईची कशी वाट लावली, याचे मार्मिक पोस्ट आदित्य ठाकरे यांनी 'एक्स' माध्यमांवर शेअर केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) आव्हान देत आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आवडत्या ठेकेदारांना कामं दिली आहेत. ठेकेदारांने महापालिकेला लुटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत', असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

'ही कामे झाली नाही, पण आता महापालिकेची तिजोरी संपल्यावर तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! आणि या जमिनी जाणार मात्र कमी किमतीत! म्हणजेच, गद्दार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मजा आणि मुंबईकरांना सजा!', असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

मुंबईतील तिजोरी रिकामी, जमिनी बिल्डरच्या घश्यात घातल्या जात आहेत. सूरतेच्या लुटीचा बदला, भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेतला जात आहे. आपल्या या तीन जागासुद्धा,त्यांच्या आवडत्या बिल्डरच्याच घशात घातल्याचा संताप आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

राजकीय उलथापालथींना वेग

मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल 125 विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघावर ज्या पक्षाचे वर्चस्व, त्याचं मुंबईवर वर्चस्व, असं मानलं जाते. शिवसेना गेली 45 वर्षांपासून मुंबईसाठी, मराठी माणसांसाठी संघर्ष केला आहे. या संघर्ष शिवसेना फुटीनंतर आता अधिक तीव्र झाला आहे. शिवसेना फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत असल्याने होणाऱ्या राजकीय उलथापालथींकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT