Mumbai News : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेक इच्छुक प्रयत्नशील आहे. या निवडणुकीत अनेक सनदी अधिकारी नशीब आजमावणार आहे. यातच मोठी बातमी समोर आली आहे.
अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करणारे तसंच माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांच्याशी पंगा घेतलेले IRS समीर वानखेडे राजकणार एन्ट्री करणार आहेत. महायुतीकडून ते निवडूक लढवणार असून, त्यांचा मतदार संघ देखील 'फिक्स' झाला आहे.
IRS समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांची चाचपणी सुरू आहे. मुंबईतील धारावी मतदार संघातून ते निवडणूक लढवू शकतात. हा मतदार संघ आरक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी IRS समीर वानखेडे यांना पक्षातून तिकीट देत, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.
IRS समीर वानखेडे अंमल पदार्थ नियंत्रण पदार्थ कक्षाचे मुंबई (Mumbai) विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला त्यांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण खूप गाजलं होते. याच ड्रग्ड प्रकरणात साक्षीदार प्रभाकर साईल याने NCBवर खंडणी वसूल करण्याचे आरोप केले.
समीर वानखेडे आरक्षित मतदार संघ धारावी म्हणून चाचपणी करत आहेत. त्यांचे मुळचे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातले आहेत. रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे गाव वानखेडे यांचे मूळ गाव आहे. माहितीनुसार त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे, समीर वानखेडे यांचे वडील राज्य सरकारच्या अबकारी विभागात कार्यरत होते. ते 2007 मध्ये या विभागातून वरिष्ठ निरीक्षक पदावर निवृत्त झाले. समीर वानखेडेंचे शिक्षण मुंबईतून झाले. त्यांचे वडील 1970 मध्ये मुंबईत आले होते.
समीर वानखेडे यांच्या धर्मावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. वानखेडें यांचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर करत, समीर दाऊद वानखेडे नाव असल्याचा दावा त्यावेळी मलिक यांनी करत खळबळ उडवून दिली होती. यावर समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचा दावा खोडून काढत हिंदू असल्याचा सांगितलं. माझे वडील हिंदू, तर आई मुस्लिम होती. पण आईवडिलांनी दोघांधी धर्म बदलला नाही, असेही समीर वानखेडे यांनी सांगितले होते. समीर वानखेडे यांचे वडील यांनी देखील माझं नाव दाऊद नाही, तर ज्ञानदेव कचरूजी वानखेडे असल्याचे त्यावेळी म्हटलं होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.