nana patol rahul gandhi Zeeshan Siddique sarkarnama
मुंबई

Zeeshan Siddique News : आधी पदावरून हटवलं, आता सिद्दिकींनी काँग्रेसलाच दिला थेट इशारा; म्हणाले...

Akshay Sabale

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी ( Baba Siddique ) यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर केंद्रीय काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं आमदार झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्याऐवजी अखिलेश यादव यांची युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर झिशान सिद्दिकींनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. "काँग्रेसला माझी गरज वाटत नाही, तर मलाही पर्याय शोधावे लागतील," असं सिद्दिकींनी म्हटलं आहे. ( Zeeshan Siddique Latest News )

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना झिशान सिद्दिकी म्हणाले, "अद्याप कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा मला फोन आला नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी हायकमांडनं मला कल्पना द्यायला हवी होती. मी काँग्रेससाठी 12 वर्षे दिली आहेत. 3 निवडणुका लढल्या आहेत. मी निवडणूक लढून युवक काँग्रेस पदावर गेलो होताे. पण मला हटवण्यात येत असेल, तर ही दुर्दैवी गोष्ट आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"वडिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी माझ्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचं सांगितलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी विधानसभेत मतदान करण्यासाठी गेल्यावर काँग्रेस नेत्यांना चांगलं वाटलं होतं, तर मी माझं कर्तव्य पार पाडतोय, असं त्यांना सांगितलेलं. तरीही मला हटवण्यात आलं," अशी खंत झिशान सिद्दिकींनी व्यक्त केली.

"काँग्रेस नेत्यांच्या मनात माझ्याविरुद्ध अविश्वास होता, तर माझ्याशी चर्चा करायला हवी होती. मी त्यावर माझे मत मांडले असते. मात्र, काँग्रेस नेत्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. मी काँग्रेसमध्ये असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. पण, काँग्रेसला माझी गरज वाटत नसेल, तर मलाही पर्याय शोधावे लागतील," असा इशारा सिद्दिकींनी पक्षाला दिला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT