Lok Sabha Election 2024 : लोकसभेला भाजपला जास्त जागा? किर्तीकर आक्रमक; केसरकर म्हणाले...

Deepak Kesarkar On Thackeray Group : "आम्ही खोके बोलणारे स्वत: खोके मागत असतात. यापुढे आमची बदनामी सहन करणार नाही," असा इशारा केसरकरांनी ठाकरे गटाला दिला.
gajanan kirtikar deepak kesarkar
gajanan kirtikar deepak kesarkarsarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) घोषणा लवकरच होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटबाबत चर्चा सुरू आहे. महायुतीतील भाजप 32, शिवसेना शिंदे गट 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. "पण, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही. 18 जागा लढविण्यावर ठाम आहोत," असा आक्रमक पवित्रा शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर ( Gajanan Kirtikar ) यांनी घेतला आहे. आता किर्तीकरांच्या विधानावर मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. ( Deepak Kesarkar On Gajanan Kirtikar Latest News )

gajanan kirtikar deepak kesarkar
Amol Mitkari : गुन्हेगाराला वाचविण्यासाठी मिटकरींचा पोलिस अधीक्षकांवर दबाव? ऑडिओ क्लिप व्हायरल

किर्तीकर नेमकं काय म्हणाले?

"22 जागांवर आमचा दावा असून, 12 जागा अमान्य आहेत. भाजप ( Bjp ) आम्हाला जागा देणार आणि आम्ही घेणार अशी स्थिती नाही. आमचे 18 खासदार निवडून आले होते. तेवढ्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. आम्ही आमच्या जागेवर ठाम असायला पाहिजे, असं माझं मत आहे. शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही बांधू देणार नाही. 18 जागा लढविण्यावर ठाम आहोत," असं किर्तीकरांनी म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किर्तीकरांच्या विधानावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनं दीपक केसरकरांचं लक्ष वेधलं. त्यावर केसरकर म्हणाले, "गजानन किर्तीकर ज्येष्ठ आहेत. पण, किती जागा मिळणार कुणालाच माहिती नाही. आमचे 18 खासदार असल्यानं 18 जागा मिळाव्यात. मात्र, जागेत अदलाबदल होऊ शकते."

gajanan kirtikar deepak kesarkar
Sanjay Raut News : 'महानंद'बाबत विखेंच्या मेहुण्यांनी करून दाखवलं, संजय राऊतांचा टोला; केला 'हा' आरोप

"पूर्वीसुद्धा पालघरची जागा आणि उमेदवारसुद्धा शिवसेनेनं घेतला. हे मैत्रीचं प्रतीक असतं. ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली मैत्री आहे. भाजप-शिवसेना युती अधिक मजबूत आहे. अजित पवार आणि त्यांचे सहकारी आल्यानं महायुती अधिक मजबूत झाली आहे. आम्ही आमची कामे घेऊन लोकांसमोर जाऊ," असं केसरकरांनी म्हटलं.

या वेळी केसरकरांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागलं आहे. "आम्ही खोके बोलणारे स्वत: खोके मागत असतात. ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतली पाहिजे. खोटी सहानुभूती मिळण्यासाठी ही नीती वापरली जात होती. यापुढे आमची बदनामी सहन करणार नाही," असा इशारा केसरकरांनी ठाकरे गटाला दिला आहे.

R

gajanan kirtikar deepak kesarkar
Manoj Jarange : "बारसकरांचे बलात्कार प्रकरण दाबलं, CM च्या प्रवक्त्याचा अन् फडणवीसांच्या...", जरांगेंचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com