Manoj Jarange : "बारसकरांचे बलात्कार प्रकरण दाबलं, CM च्या प्रवक्त्याचा अन् फडणवीसांच्या...", जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil Allegation Ajay Maharaj Baraskar : "पहिल्या गावातून भिशी घेऊन दुसऱ्या गावात बारसकर पळून गेला. बारसकर हा महाराज शब्दासाठी डाग आहे," अशी टीकाही मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
Ajay Maharaj Baraskar Manoj Jarange Patil
Ajay Maharaj Baraskar Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणासाठी लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. "जरांगेंना कायद्याचं काहीही कळत नाही. ते सामाजिक विद्वेश पसरवत असून, श्रेयवादासाठी काम करत आहेत. जरांगेंचे मगरीचे अश्रू आहेत. त्यांनी मराठ्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत," असे आरोप अजय महाराज बारसकरांनी जरांगेंवर केले होते. याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत खळबळजनक दावे केले आहेत. "बारसकर हा महाराज शब्दासाठी डाग आहे," अशी टीका जरांगे पाटलांनी केली आहे. . ( Manoj Jarange Patil Latest News )

Ajay Maharaj Baraskar Manoj Jarange Patil
Sanjay Raut News : 'महानंद'बाबत विखेंच्या मेहुण्यांनी करून दाखवलं, संजय राऊतांचा टोला; केला 'हा' आरोप

एकेरी उल्लेख करत जरांगे पाटील म्हणाले, "तो काय महाराज आहे काय? तो विकत घेतलेला आहे. मी काय वाईट केलं? 57 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून, दीड कोटी मराठ्यांना फायदा झाला आहे. मागासवर्गीय आयोग स्थापन करायला लावला. 10 टक्के आरक्षण मिळालं. मराठा समाज एकत्र आणला. मग, मी चूक केली का? नाव ठेवण्यासारखं मी काय केलं?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बारसकरने महिलेवर बलात्कार केल्याचं त्याच्या गावातील लोक सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या प्रवक्त्याचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील एका मोठ्या नेत्याचा बारसकर हा एक ट्रॅप आहे. ज्या महिलेचा विनयभंग झाला, ते प्रकरण दाबण्यात आलं. माझ्याविरोधात बोल अन्यथा विनयभंगाचे प्रकरण उघड करू, असा दबाव बारसकरवर टाकण्यात आला," असं जरांगे पाटलांनी सांगितलं.

Ajay Maharaj Baraskar Manoj Jarange Patil
Amol Mitkari : गुन्हेगाराला वाचविण्यासाठी मिटकरींचा पोलिस अधीक्षकांवर दबाव? ऑडिओ क्लिप व्हायरल

"बारसकर बच्चू कडू यांच्याबरोबर येत होता. बारसकरला सोशल मीडियावर कुणी ओळखत नाही. त्याची पत्रकार परिषद 1 तास दाखवण्यात आली. हे सगळं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकते का? बारसकरने कुठल्या तरी संस्थेच्या नावाखाली 300 कोटी रुपये जमा केले आहेत. पहिल्या गावातून भिशी घेऊन दुसऱ्या गावात बारसकर पळून गेला. बारसकर हा महाराज शब्दासाठी डाग आहे," असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला आहे.

"सरकारच्या आडून बारसकरांनी विधान करू नये. माझ्या कुटुंबाबद्दल बोलले तर अवघड जाईल," असा इशारा जरांगे पाटलांनी बासरकरांना दिला आहे.

R

Ajay Maharaj Baraskar Manoj Jarange Patil
Sanjay Raut : "भाजपचे 10 बाप झाले आहेत, शिवसेना ही...", राऊतांचं फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com