Babanrao Dhakane Passed Away Sarkarnama
नगर

Babanrao Dhakane Passed Away : बबनराव ढाकणे : वंजारी समाजातील पहिले खासदार !

Mangesh Mahale

प्रदीप पेंढारे

Babanrao Dhakane Died : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे (वय 85) यांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा राजकीय संघर्ष मोठा आहे.

राम मंदिर आणि बोफोर्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रिक निवडणूक ते बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातून जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले होते. वंजारी समाजाचे देशातील पहिले खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला.

राम मंदिर कोसळल्यानंतर देशातील तणावाची स्थिती होती. या कठीण काळात त्यांनी केंद्रात मंत्री होते. मंडल आयोग, राम मंदिराच्या मुद्द्यांवरून केंद्रीतील व्ही. पी. सिंग सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर यांनी 21 नोव्हेंबर 1990 रोजी सरकार स्थापन केले.

चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये बबनराव ऊर्जा राज्यमंत्री होते. बबनराव ढाकणे यांनी राजकीय क्षेत्रात अनेक चढउतार अनुभवत होते. ते पुढे शरद पवार यांच्या संपर्कात आले. शरद पवार 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना बबनराव यांनी पाथर्डी येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचा राजीनामा...

लोकसभा व विधानसभा 1999 मध्ये एकत्रित झाल्या. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती. या पक्षाकडून बबनराव ढाकणे यांनी पाथर्डी विधानसभेची निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बबनराव ढाकणे यांनी 2001 मध्ये राष्ट्रवादीचा राजीनामा दिला.

शेतकरी विचार दल...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी त्यांनी 31 आॅक्टोबर 2001 मध्ये शेतकरी विचार दल या राजकीय पक्षाची स्थापना केली. क्रांतिवीर नागनाथ आण्णा नाईकवाडी यांची त्यांना साथ मिळाली. महाराष्ट्रात 2002 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्या.

यात बबनराव यांच्या शेतकरी विचार दल पक्षाला नगर जिल्हा परिषदेत सात, तर पंचायत समिती दहा ठिकाणी विजय मिळवला. राजकीय क्षेत्रापासून बबनराव ढाकणे 2004 पासून अलिप्त होत, सामाजिक कार्यात अग्रेसर होते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT