Devendra Fadnavis, Pankaja Munde, Nitin Gadkari Sarkarnama
नागपूर

BJP Political News : फडणवीसांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे काय बोलणार?

सरकारनामा ब्यूरो

नागपुरातून याचा आढावा घेत आहे. विशेष म्हणजे या बैठकीच्या माध्यमातून पंकजा मुंडे सक्रिय होत असून ते या निकालाच्या निमित्ताने त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

येणारी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रदेश कार्यसमितीची नागपुरात आढावा बैठक सुरू आहे. तत्पूर्वी पाच राज्यांच्या निवडणुकींचा अर्थ काय, त्यातून महाराष्ट्र भाजप कोणता धडा देणार, त्यातून स्वकियांना मित्रपक्षांबाबत कोणते धोरण राबवणार, विशेष म्हणजे उमेदवार देताना कोणते निकष असतील, त्या राज्यांत भाजपने जसे धक्कातंत्र वापरले त्या तंत्राचा महाराष्ट्रात वापर होऊ शकतो काय, याचे सूतोवाच या बैठकीतून दिले जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि नितीन गडकरी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय दुपारी तीन ते चार दरम्यान पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटी तसेच व्यासपीठापासून राहतात असा आरोप नेहमी होतो. या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण आणि मार्गदर्शन हे या बैठकीचे वैशिष्ठ्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समारोपाचे भाषण आणि मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस उपस्थित आहेत. ही बैठक जेवढी भाजपसाठी महत्त्वाची आहे तेवढीच महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठीही महत्त्वाची आहे. लोकसभेच्या ४८ जागा लढवताना भाजपचे धोरण कसे असेल, हे बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(Edited by - Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT