Nagar Crime News : भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह टोळीविरुद्ध 'मोक्का'

Murder case of NCP worker Ankush Chattar : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता अंकुश चत्तर याच्या खुनप्रकरणी अटकेतील आरोपी..
Swapnil Shinde Murder Ankush Chattar
Swapnil Shinde Murder Ankush ChattarSarkarnama
Published on
Updated on

Nagar Crime News : नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता अंकुश चत्तर याच्या खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी 'मोक्का' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या या प्रस्तावाला नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर यांनी मान्यता दिली आहे.

नगर (Nagar) भाजप (BJP) नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे (रा. वैदूवाडी, सावेडी, नगर) व त्याच्या साथीदारांनी १५ जुलैला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता अंकुश चत्तरवर हल्ला केला होता. यात अंकुश चत्तर गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला.

Swapnil Shinde Murder Ankush Chattar
Lok Sabha Security Breach : संसदेत घुसखोरीचा हा होता 'प्लॅन बी'

सुरूवातीला लहान मुलांच्या भांडणातून हा खून झाल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात अंकुश चत्तर व स्वप्निल शिंदे यांच्यात जमिनीच्या व्यवहारातून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्वप्निल शिंदे व त्याचे साथीदार कारागृहात आहे. या गुन्ह्यात चार अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

या खुनाच्या गुन्ह्यात सहायक निरीक्षक गणेश वारूळे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. स्वप्निल शिंदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकोश ओला यांनी त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का (Mokka) अन्वये कारवाईचा प्रस्ताव करण्याचा आदेश दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानुसार स्वप्निल शिंदे, त्याचा साथीदार अक्षय प्रल्हाद हाके (रा. नंदनवन काॅलनी, भिस्तबाग चौक, सावेडी), अभिजीत रमेश बुलाख (रा. गजराज फॅक्टरीजवळ, सावेडी), महेश नारायण कुर्हे (रा. वाघमळा, सावेडी), सुरज राजन कांबळे ऊर्फ मिक्या (रा. भुतकरवाडी, सावेडी), मिथुन सुनील धोत्रे (रा. पवनगर, सावेडी), अरुण अशोक पवार (रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा), राजू भास्कर फुलार (रा. पवननगर, सावेडी) या टोळीवर 'मोक्का'न्वये कारवाई करण्यात आली आहे आहे.

(Edited by Amol Sutar)

Swapnil Shinde Murder Ankush Chattar
Ramakant Khalap News : 'त्या'बाबत मोदींनी नेहरूंवर आरोप करणं योग्य नाही..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com