-विशाल गुंजवटे
Maan Political News : माण आणि खटाव तालुक्यातील एकूण ४२ गावांच्या सिंचन सुविधेसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत तब्बल ६८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर येथे मंत्रीमडळाच्या बैठकीत विस्तारीत टेंभू प्रकल्पासाठी एकूण ७३७० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण, खटावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. माण - खटाव मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माण आणि खटाव तालुक्यातील ३२ गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी लढा उभारला होता. या पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करताना टेंभू योजनेचे कॅनॉल फोडण्याचा इशारा तत्कालीन सरकार आणि प्रशासनाला दिला होता.
टेंभू योजनेचे पाणी माण , खटावमधील गावांना देण्यासाठी वाढीव पाण्याची तरतूद करणे आवश्यक होते. अथक परिश्रम करुन देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्याने दोन्ही तालुक्यातील ४२ गावांसाठी अडिच टीएमसी अतिरिक्त पाण्याची तरतूद ऑक्टोबरच्या प्रारंभी करण्यात आली होती. त्यासाठी कृष्णा प्रकल्पाचे फेर जल नियोजन करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला होता.
फेर जल नियोजनामुळे पाणी उपलब्ध झाले तरी दुष्काळी भागात पाणी पोहचविणाऱ्या योजनांना निधीची तरतूद होणे गरजेचे होते. आमदार जयकुमार गोरे यांनी या भागातील जनतेला लवकरच निधीची तरतूद करण्याचा शब्द दिला होता. गुरुवारी नागपूर येथे मंत्रीमडळाच्या बैठकीत विस्तारीत टेंभू प्रकल्पासाठी एकूण ७३७० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याने माण - खटाव मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माण आणि खटाव तालुक्यातील ४२ गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत ६८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून दोन्ही तालुक्यांचे मिळून १३१२६ हेक्टर क्षेत्र अडिच टीएमसी पाण्याद्वारे सिंचनाखाली येणार आहे. गुरुवारी निधीची तरतूद झाल्याचे समजताच माण - खटाव मतदारसंघात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
टेंभू लाभक्षेत्रातील माण, खटावची गावे .....
विरळी, काळचौंडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, वरकुटे मलवडी, कुरणेवाडी, लोधवडे, बनगरवाडी, जांभुळणी, चिलारवाडी, वळई, पुकळेवाडी, कुकुडवाड, वडजल, नरवणे, दोरगेवाडी, काळेवाडी ( नरवणे ) , किरकसाल, ढाकणी, पळसावडे, कलेढोण, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, ढोकळवाडी, मायणी, हिवरवाडी, मानेवाडी, कान्हरवाडी, खातवळ, पडळ, अनफळे, धोंडेवाडी, दातेवाडी, पळसगाव, कणसेवाडी, एनकूळ, यलमरवाडी, पिंपरी, कातरखटाव, डांभेवाडी, बोंबाळे, डाळमोडी, हिंगणे, तडवळे, मांडवे, पेडगाव, सातेवाडी, भिकवडी. Maharashtra Political News
जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान ......
मतदारसंघात उरमोडी, तारळीचे पाणी आणले आहे. जिहे-कठापूरचे पाणी पोहचत आहे. तरीही दोन्ही तालुक्यातील ४२ गावांना टेंभूचे पाणी देणे गरजेचे होते. १५ वर्षे पाण्याची लढाई लढताना अनेक आव्हाने आली. या कामातही अडचणी आणि आव्हाने होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने पाण्याचे फेरवाटप आणि निधीची तरतूद झाली आहे. त्यांनी दहिवडीतील जाहीर सभेत जनतेला तसा शब्द दिला होता. मी त्यांच्याच वतीने जनतेला पाणी देण्याचा विश्वास देत होतो. आज शब्दपूर्ती झाल्याचे समाधान आहे.
- आमदार जयकुमार गोरे
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.