Devendra Fadnavis News :  Sarkarnama
नागपूर

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री फडणवीसांची गडचिरोलीत मोठी घोषणा, पाचशे कोटींचा...

Political News: गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामासाठी ५०० कोटीचा निधी.

Sachin Waghmare

Nagpur News : गडचिरोलीतील महत्वाच्या प्रश्नांवर नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील विकासकामासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या शिवाय जिल्ह्यातील रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

मेडिकल कॉलेजचा प्रश्न अनेक दिवसापासून मार्गी लागत नव्हता. मात्र, आता येत्या जूनपासून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीतील महत्वाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. या बैठकीत रखडलेल्या प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसापासुन येथील प्रकल्प रखडले आहेत. विशेषतः जिल्ह्यातील काही भागातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध असून त्यासोबतच विजेचा प्रश्न येत्या काळात सोडविणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी स्पष्ट केले.

एअरपोर्ट सुरु करण्यासाठी प्रयत्न

गडचिरोलीतील अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या काळात ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याशिवाय येथील मेडिकल कॉलेज जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. त्याशिवाय येथील एअरपोर्ट सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT