नागपूर : शिवसेना (shivsena)-संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) युतीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २६) करण्यात आली. त्या युतीवर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना-भाजप युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या नव्या युतीवर भाष्य केले आहे. अवघ्या एका वाक्यात त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (Devendra Fadnavis' suggestive reaction to Shiv Sena-Sambhaji Brigade alliance; said...)
नागपूरच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीबाबत विचारले असता, ते म्हणाले की, “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्या हजेरीत नव्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. मराठा महासंघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनीही या युतीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कालचे शत्रू आजचे मित्र आहेत. आमची राजकीय भूमिका शिवसेनेशी सुसंगत असेल. पण आमची सामजिक भूमिका आहे तीच काय राहिल, असे स्पष्ट केले.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या निर्णयावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली आहे. आता या जहाजाला वाचवता येणार नाही, असं ज्यांना वाटतं, तेच लोक वेगळा निर्णय घेत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. पण, काँग्रेसची अंतर्गत गोष्ट आहे. मी त्यावर बोलणे योग्य नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे शिवसेनेचाही पारंपारिक दसरा मेळावा असतो, तो दरवर्षी शिवाजी पार्कवर भरतो. मात्र, यंदा पोलिस प्रशासनाकडून परवानगी मिळते की नाही, याची उत्सुकता लागली आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेचे नेत आहेत. त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबाबत मला माहिती नाही. पण गृहमंत्री म्हणून एकच सांगतो की जे नियमानुसार असेल तेच आम्ही करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.