शिवसेना आमदार राजन साळवींनी दोन दिवसांत दोनदा घेतली फडणवीसांच्या विश्वासू मंत्र्याची भेट

या दोघांमध्ये बंद खोलीत प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे.
 Ravindra Chavan-Rajan Salvi
Ravindra Chavan-Rajan SalviSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. या दोघांमध्ये बंद खोलीत प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. साळवी यांनी चव्हाण यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतही त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, पक्षांतरांचा त्यांनी इन्कार केलेा होता. (Shiv Sena MLA Rajan Salvi met Minister Ravindra Chavan twice in two days)

राजन साळवी हे कोकणातील राजापूर मतदारसंघाचे शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व करतात. मंत्री रवींद्र चव्हाण सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्येच आमदार साळवी यांनी शुक्रवारी (ता. २६ ऑगस्ट) चिपळूणमध्ये, तर आज (ता. २७ ऑगस्ट) लांजा येथे चव्हाण यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांत साळवी यांनी दुसऱ्यांदा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

 Ravindra Chavan-Rajan Salvi
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या कारणासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटले

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही आमदार साळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. रवींद्र चव्हाण हे कालपासून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काल आमदार भास्कर जाधव यांनीही चव्हाण यांची भेट घेतली होती. शिवाय काही काळ त्यांन चव्हाण यांच्या गाडीतून प्रवा केला होता. राजन साळवी हे कालही चव्हाण यांची भेट घेतली होती. आजही ते मंत्री चव्हाण यांना भेटण्यासाठी आले हेाते. त्यावेळी या दोघांमध्ये अर्धा तासापेक्षा जास्त वेळ खलबतं झाल्याची माहिती आहे. त्या भेटीचा तपशील मात्र अद्याप कळू शकलेला नाही.

 Ravindra Chavan-Rajan Salvi
पृथ्वीराजबाबांचे नेतृत्वाला इशाऱ्यांवर इशारे...'ती काँग्रेसची ऐतिहासिक चूक ठरेल, जनता माफ करणार नाही'!

आमदार राजन साळवी हे प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याची माहिती आहे. कोकणच्या प्रश्नासाठी आम्ही कोकणातील प्रतिनिधि एकत्र आलो आहोत. कोकणच्या प्रश्नासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आलो आहोत, असेही सांगितले जात आहे.

 Ravindra Chavan-Rajan Salvi
ईडीची चौकशी लावतो, म्हणणाऱ्या राऊतांना सोपलांचे उघड चॅलेंज : ‘दोघांचीही चौकशी लावू...’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com