उद्धव ठाकरे सैराट मित्र मंडळ सुद्धा सोबत करतील ; निलेश राणेंची खोचक टीका

Nilesh Rane : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षांनी युतीची घोषणा केली होती.
Nilesh Rane Uddhav Thackeray
Nilesh Rane Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात नवे राजकीय समीकरण जुळून आले आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या राजकीय पक्षांनी युतीची घोषणा केली. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर राज्यात एक महत्त्वाचं राजकीय समीकरण उदयाला आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी काल (26 अॉगस्ट) पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. याच पार्श्वभमीवर आता भाजपचे नेते माझी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. (Nilesh Rane Latest News)

Nilesh Rane Uddhav Thackeray
नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

निलेश राणे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर खोचक वार केला आहे. राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.' राणेंच्या या टीकेमुळे आता पुन्हा राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र यावर अजून शिवसेनेची प्रतिक्रीया आलेली नाही.

दरम्यान, या लढवय्या सहकाऱ्यांचं शिवसेनेसोबत युतीसाठी स्वागत करतोय. प्रादेशिक पक्ष आणि राज्याची अस्मिता चिरडून टाकणं या प्रकाराला लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्याच भविष्याचा नाही तर, देशात लोकशाही असेल की बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. आपण संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाडत आलाय. या शापालाच आपण गाडून टाकूया, असे उद्धव ठाकरे ही नवी युती जाहीर करताना म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com