Dhirendra Shastri sarkarnama
नागपूर

Dhirendra Shastri's Apology : धीरेंद्र शास्त्रींनी शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानाबद्दल मागितली माफी; 'स्वप्नातसुद्धा आम्ही सहन करणार नाही...'

Shivaji Maharaj Regarding Statement : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावरून वाद झाल्यानंतर बागेश्वरबाबांनी माफी मागितली. आपले वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतले गेले असून भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त केली.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 26 April : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात वाद निर्माण झालेला असतानाच आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वरबाबा यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. ज्यांच्या स्वराज्यापासून आम्ही हिंदूराष्ट्राची संकल्पना शिकलो, त्या शिवाजी महाराजांबद्दल आम्ही स्वप्नातही चुकीचे बोलणार नाही. आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो, अशा शब्दांत बागेश्वरबाबांनी आपला माफीनामा सादर केला आहे.

नागपूर येथील संघाच्या कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावरून राज्यात धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात टीकेची झोड उठवली जाऊ लागली होती. त्याला धार येण्याआधीच धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचे काम केले आहे.

बागेश्वरबाबा म्हणाले, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला, ते चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यात आले. ज्यांच्या स्वराजापासून आम्ही हिंदूराष्ट्राची संकल्पना घेतली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj) अवमानकारक बोलणे तर दूरच स्वप्नातसुद्धा कोणी निंदा केली तर आम्ही ती सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सर्वच लोक आपले आहेत, त्यामुळे आपण आपापसांत वाद घालत बसलो तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल, त्यामुळे आपण एकमेकांमध्ये भांडलं नाही पाहिजे, असेही शास्त्री म्हणाले.

ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही फक्त गुरु महिमा सांगितला. संतांना, महंतांना देशातील राजा किती मानत होते, हे आमचा सांगण्याचा प्रयत्न होता. पण आमचे म्हणणे चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यात आले. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो.

एक मुलगा संघाला द्या; म्हणजे कट्टर राष्ट्रवादी बनावा

चार मुलांना जन्म द्या आणि एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या, या विधानावरून धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक मुलगा संघाला द्या म्हणजे कट्टर राष्ट्रवादी बनावा. त्या कलेक्टर बनवा, लष्करात पाठवा किंवा आणखी काय बनवा. पण त्याला कट्टर सनातनी विचारांचा बनावा, असा माझा ते सांगण्यामागे हेतू होता, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT