

Pandharpur, 26 April : ‘भक्ताची जमीन कुठल्याही देवाला चालत नाही. फक्त एका विशिष्ट देवालाच शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. फडणवीसांवर केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्युतर दिले आहे. जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनींचा हिशेब केला तर त्यांना उत्तरही देता येणार नाही, असा पलटवार गोरेंनी केला आहे.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात शेतकरी मेळाव्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावरून माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांनी उत्तर दिले आहे.
जयंत पाटील हे जुने जाणते नेते आहेत. जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशेब केला, तर त्यांना उत्तरही देता येणार नाही. देवाभाऊंनी समृद्धी आणि शक्तीपीठ हे राज्याच्या विकासाकरता मार्ग निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग फडणवीस यांच्या मार्गे जातो. जयंत पाटील ही या मार्गात सहभागी होतील, असे सचूक विधानही मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले.
पालकमंत्री गोरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्या संस्थांच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत. त्याचा हिशेब केला, तर त्यांना उत्तरही देता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. त्या दृष्टीने त्यांनी विकास कामे हाती घेतली आहेत. त्यांच्या सारखा दूरदृष्टीचा नेता सध्याच्या परिस्थितीत चुकूनही सापडणार नाही.
मनोहरमामा भोसले याच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो पुढे येत आहेत. कुणी कोणाला भेटणे काही गैर नाही. मात्र, भोंदूबाबाच्या कृत्यात सामील कोण झाले असेल, तर हे चुकीचे आहे. त्याच्या कृत्यामध्ये कोणाचा सहभाग असेल, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशाराही गोरे यांनी दिला.
भीमा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा विसर्ग ता. 30 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन केलेले आहे. सध्या तरी कुठेही टँकरची मागणी दिसत नाही. पुढच्या महिन्यात कुठे टॅंकर लागले तर ते देण्यात येतील. मात्र, पाण्याची सध्याची परिस्थिती पाहता टँकरने पाणी पुरवठा करावा लगेल, अशी शक्यता कमी असल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.