IAF acknowledges the loss of Flt Lt Purvesh Duragkar, who sustained fatal injuries in the Su-30 crash.  
नागपूर

Purvesh Durugkar: ऑपरेशन सिंदूरमध्ये जीवाची बाजी लावलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; फायटर पायलट पूर्वेश दुरुगकर यांचं सुखोई विमान कोसळलं

Purvesh Durugkar: पाकिस्तानविरोधातील ऑपरेशन सिंदुरमध्ये जीवाची बाजी लावलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा अर्थात फ्लाईट लेफ्टनंट पुर्गेश दुरागकर यांना वीरमरण आलं आहे.

Amit Ujagare

Purvesh Durugkar: पाकिस्तानविरोधातील ऑपरेशन सिंदुरमध्ये जीवाची बाजी लावलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा अर्थात फ्लाईट लेफ्टनंट पुर्गेश दुरागकर यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या सुखोई या लढाऊ विमानला आसाममध्ये भीषण अपघात झाला, विमान कोसळल्यानंतर ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी पायलट स्क्वाड्रन लिडर अनुज हे देखील शहीद झाले आहेत. भारतीय हवाई दलानं ही माहिती दिली आहे. दोघांच्या निधनावर दलानं श्रद्धांजलीही देखील वाहिली आहे. पूर्वेश दुरुगकर यांच्या वडिलांनी आपल्या लेकाची स्वप्न आणि आठवणींना उजाळा दिला.

नेमकं काय घडलं?

फ्लाईट लेफ्टनंट पुर्गेश दुरागकर यांच्या सुखोई SU-30 या लढाऊ विमानानं गुरुवारी ५ मार्च रोजी आसाममधील जोरहाट एअरबेसवरुन रुटीन उड्डाण केलं. त्यानंतर रात्री ७.४२ वाजता त्यांचं विमान रडावरुन गायब झालं होतं. हे विमान कोसळल्यानं रडारवरुन दिसेनासं झालं होतं, यामध्ये विमानातील दोन्ही पायलट्स गंभीररित्या जखमी झाले होते. पण नंतर या दोघांचाही मृत्यू झाला. या दोन पायलट्समध्ये स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पुर्गेश दुरागकर यांचा समावेश होता.

आठवणींना वडिलांकडून उजाळा

नागपूर येथील रहिवासी असलेले फ्लाईट लेफ्टनंट पुर्गेश दुरागकर यांची वयाच्या २७ व्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्ती झाली होती. त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे नागपूरच्या साउथ पॉईंट शाळेतून तर डॉ. आंबेडकर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स विषयात त्यांनी बारावी आणि बीएस्सी पूर्ण केलं. दहावीत त्यांना 88 तर बारावीत 70 टक्के गुण मिळाले होते. शाळेत ८ वीत असल्यामुळं एअरफोर्स पायलट होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यानुसार प्रचंड मेहनतीने त्यांनी हे स्वप्न पूर्णही केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर हैदराबादच्या एअर फोर्स अकॅडमी प्रशिक्षण आणि नंतर वायुसेनेत नेविगेटर म्हणून त्यांचं काम सुरु झालं होतं. अद्याप अविवाहित असलेल्या पुर्गेश यांचं लग्नापूर्वीच हवाई दलातील परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं त्यांचं स्वप्न होतं.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग

पाकिस्तानविरोधात भारतानं लॉन्च केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्येही पुर्गेश दुरागकर यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुर्गेश यांच्यावर मोठा प्रभाव होता. आपली दोन्ही मुलं (मुलगा, मुलगी) हे आपल्या नियोजित क्षेत्रात काम करत असल्यानं मी माझ्या मित्रांना नेहमी सांगायचो की मी जगातील सर्वात सुखी बाप आहे, असं पुर्वेश यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. शहीद पुर्वेश यांचे वडील मध्य रेल्वे ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहीणी आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास नातेवाईकांकडून आम्हाला या दुर्घेटनेची माहिती मिळाली. त्यानंतर हवाई दलातील अधिकारी कॅप्टन यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं, “पूर्वेश इज नो मोर” हे वाक्य आमच्यासाठी मोठा आघात होता, अशा भावुक शब्दांत पुर्वेश यांच्या निधनाची बातमी आपल्याला कळाल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT