Nagpur News : सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धडाक्यात पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. चांदा ते बांदा प्रवेश होत असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.5) नागपूर शहरातील दहा माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. मात्र या समारंभात शहर प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच पूर्व विदर्भाचे संघटक उपस्थित नव्हते. त्यांना निमंत्रितही करण्यात आले नव्हते किंबहूना माहितीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
तर शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या भांडणात कार्यकर्त्यांची फरफट होत आहे. ही फरफट रोखण्यासाठी पक्ष प्रवेश समारंभासाठी नियमावली तयार करावी आणि प्रोटोकॉल निश्चित करावा अशी मागणी आता केली जात आहे.
आशिष जयस्वाल मंत्रिमंडळात आहेत. ते ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमदार कृपाल तुमाने आहेत. नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत एकदाही शिवसैनिकांसोबत संपर्क साधला नाही. किरण पांडव हे पूर्व विदर्भाचे संघटक आहेत.
मात्र या सर्व पदाधिकाऱ्यांचा आपसात कुठलाही ताळमेळ व समन्वय नसल्याचे दिसून येते. यापूर्वी आभार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला आले होते. यावेळी किरण पांडव यांच्या नेतृत्वात प्रवेश समारंभ झाला झाला होता. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील उद्धव ठाकरे सेना, मनसे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले होते. काही ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. यापैकी अनेकांना अद्याप पदे वाटप करण्यात आली नाहीत.
मनसेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर यांना दोन महिन्यानंतर पूर्व विदर्भाचे सहसंघटक करण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत आलेले ग्रामीणचे काही पदाधिकारी अद्याप वेटिंगवर आहे. किरण पांडव यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रवेश केला असला तरी संपर्क प्रमुख या नात्याने त्यांना कृपाल तुमाने यांच्याकडे त्यांना चकरा माराव्या लागत आहे. आशिष जयस्वाल यांनी शहरातील 10 नगरसेवकांना प्रवेश दिला. मात्र शहर प्रमुखाला याची कल्पनाच नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.