bhaskar jadhav uddhav thackeray sarkarnama
नागपूर

Shivsena : शिवसैनिकांच्या मागण्यांमुळे काँग्रेसची डोकेदुखी चालली वाढत

Shivsena vs Congress : शिवसैनिकांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघासह कामठी मतदारसंघ ही आम्हालाच द्यावा अशी त्यांची मागणी आहे. उत्साही शिवसैनिकांमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महाविकास आघाडीने रामटेक लोकसभा मतदारसंघ जिंकल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघासह कामठी मतदारसंघ ही आम्हालाच द्यावा अशी त्यांची मागणी आहे. उत्साही शिवसैनिकांमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे.

नागपूर शहरातील पूर्व नागपूर, दक्षिण आणि मध्य नागपूर, ग्रामीणमधील हिंगणा, रामटेक, कामठी, या जागांवर शिवसैनिकांची नजर आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. या जागांवर शिवसेना दावा करणार असल्याचे भास्कर जाधव यांचे म्हणणे आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ आमचा होता. तो कायम राहावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र आघाडी धर्म पाळण्यासाठी तो काँग्रेससाठी सोडण्यात आला. 

भाजपसोबत युती आसा संपुष्टात आली आहे. पूर्व  विदर्भातील १४ विधानसभा मतदारस संघाचा आढावा घेण्यात येत आहरे. काही जागा अदलाबदल केल्या जातील. सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जाईल. संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवाराची माहिती गोळा केली जात आहे. सर्वच बाबीचा  अभ्यास आणि अहवाल तयार करून उद्वव ठाकरे यांना सोपवणार असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. 

लोकसभेत पाच वेळा निवडून आलेली पारंपरिक जागा आम्ही सोडली. कोल्हापूर, अमरावतीची जागा आम्ही सोडली. त्याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. रामटेकची जागा आम्ही निवडून आणली आहे. ती आमच्याकडे राहील असेही जाधव यांनी सांगितले.

शिवसेनेने १९९० पासून मुंबईच्या बाहेर निवडणूक लढायला सुरुवात केली. भाजपसोबत केलेल्या युतीत सर्वात जास्त आमदारही शिवसेनेचे निवडूण आले होते.  हळुहळु भाजपने मैत्रीच्या नावाखाली आमचे उमेदवार पाडण्याचे काम केले. अनेक जागा हिसकावून घेतल्या. त्यामुळे शिवसेना विदर्भात कमजोर झाली. भाजपाचा हा डाव आमच्या लभात आला नाही. आता मात्र पुन्हा शिवसैनिक जोमात आला आहे. विदर्भात शिवसेना पूर्वीचे वैभव मिळवून देणार असल्याचा दावाही भास्कर जाधव यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT