Aditya Thackeray Eknath Shinde political clash Sarkarnama
नाशिक

Aditya Thackeray News: आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची पुन्हा दाबली दुखरी नस! म्हणाले, नगर विकास खाते कोणाकडे आहे?

Aditya Thackeray Target Eknath Shinde: नाशिकच्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. ‘नगर विकास खाते कोणाकडे आहे?’ असा सवाल करत रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका.

Mangesh Mahale

Aditya Thackeray News: नाशिक शहरातील खड्डे आणि नादुरुस्त रस्ते गंभीर विषय आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात सहा नागरिकांचा मृत्यू तर 100 राहून अधिक लोक जायबंदी झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे नगरसेवक त्याचे बळी ठरले.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकला भेट दिली. पुण्याहून नाशिकला येताना त्यांनी चाकण आणि नाशिकच्या खड्ड्यांचा अनुभव सांगितला. महापालिकेच्या कारभारावर बोलतानाच त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची दुखरी नस पकडली.

राज्यभरातील रस्ते नादुरुस्त आहेत. अगदी समृद्धी महामार्गावर देखील पॅच लावले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न करून फेकणाथ शिंदे कोणाच्या आशीर्वादाने मंत्री आहेत? नगर विकास मंत्री कोण आहेत? असा सूचक प्रश्न त्यांनी केला.

नाशिक सह राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्ते दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात सगळीकडे खड्डे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे अवघड आहे. त्याबाबत त्यांनी थेट नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे.

ठाकरे म्हणाले, यापूर्वीही नाशिकला येऊन गेलो. आजची स्थिती आहे तशीच स्थिती आहे. त्यामध्ये बदल झालेला नाही. आजही प्रवास करताना पाठ दुखी होतेच. नाकर्त्या सरकारचे हेच लक्षण आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहराची वाट लागली आहे. त्यावर साधू महंतांनी ही या कामांची गरज आहे का? असा प्रश्न केला. याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. हा सर्व जनतेचा पैसा आहे. नासाडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिक महापालिकेत भाजप बरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत सहभागी आहे. उपमहापौरांसह महत्त्वाच्या निर्णयात हा पक्ष सहभागी असतो. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे पक्षाने केला आहे. वस्तूता नगर विकास खातेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे या दुरावस्थेची जबाबदारी एकनाथ शिंदे पक्ष टाळू शकत नाही, यावर ठाकरे यांनी बोट ठेवल्याने तो चर्चेचा विषय बनला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT